पद्मश्रीच्या कार्यालयातच सहाय्यक सरव्यवस्थापकाला कपडे फाटेपर्यंत चोपलेकोल्हापूर - पद्मश्रींच्या कोल्हापूर कार्यालयात लफडेबाज आयटी मॅनेजरला चोपल्याचे प्रकरण ताजे असतानाच जिल्ह्यातील एका ब्युरो चीफने त्रासाला कंटाळून सहाय्यक सरव्यवस्थापकाला मांडवातच बुधवारी कपडे फाटेपर्यंत चोप दिला. सुरक्षा रक्षक मदतीला आल्याने त्याची सुटका झाली. तर आपल्यावरही हात पडेल या भितीपोटी , 'आंबे'पाडू समूह सरव्यवस्थापकाने पॅन्ट सांभाळत कार्यालयातून पळ काढला. 


बेळगावचा कुंदा आणून पद्मश्रींच्या वृत्तपत्रावर एकेकाळी कुरघोडी करु पाहणारा मात्र सध्या पद्मश्रीचे पाय चाटणारा मांडवरुपी असिस्टंट जनरल मॅनेजर आणि रणात झेंडा लावल्याचा रुबाब आणणारा 'प्रति पद्मश्री' यांची नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था आहे. हे दोघांनी दादांच्या दोन्ही कानाजवळ असल्याचा फायदा घेत कार्यालयात अनेकांची मुस्कटदाबी केली आहे. दादांचे कान भरुन यांनी अनेक चांगल्या कर्मचाऱ्यांचे करियर बरबाद केले आहे. 


मानबिंदूतील जामिनावर असलेला 'न फुललेला' आणि 'बिकवास' हे यांचे मार्गदर्शक आणि टेबल मेंबर आहेत. यांच्या आठ- पंधरा दिवसाला रस्त्यावर उलटी आणि मुत्रदान होईपर्यंत 'बैठका' होतात. याचवेळी अनेकांवर गेम करण्याचे धोरण ठरते. यांना डोईजड होतील म्हणून अनेकांचे पंख कापले आहे. तर अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पद्मश्रींच्या कार्यालयात प्रामाणिक कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी हा नित्याचाच प्रकार झाला असून काम करणारा मरणार आणि बोंबलत फिरणारा पंचपक्वानांच्या पंक्तीला बसणार अशी पद्धत रुढ झाली आहे. चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आणि रजांसाठी सुरेषेचे वारंवार हात ओले करावे लागतात. पण हे पद्मश्री आणि दादांना कोण सांगणार? ज्यांच्यावर सांगायची जबाबदारी असलेली आंबे पाडण्यासाठी आपल्या पाटीलकीचा वापर करीत आहेत. यांची साखळी असून खुर्ची उबवण्यासाठी आणि खिसे भरण्यासाठी हे आपल्या पदाचा वापर करत आहेत. 


यांनी अनेकांना मानसिक,  आर्थिक आणि अनैतिक त्रास दिला आहे. बेळगावचा कुंदा आणून पद्मश्रींच्या वृत्तपत्रावर एकेकाळी कुरघोडी करु पाहणारा मात्र सध्या पद्मश्रींचे पायचाटू मांडवरुपी असिस्टंट जनरल मॅनेजरने अनेकांचे जगणे मुश्किल करुन सोडले आहे. जिल्ह्यातील एका जुन्या ब्युरो चीफने यांचे वारंवार मांडवातील लाड पुरवूनही  त्याच्याकडे अनैतिक मागणी करुन त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात येत होती. या प्रकाराला कंटाळलेल्या वस्रनगरीतील एका सरकार घरातील सरदाराने बुधवारी सायंकाळी पद्मश्रींचे भाऊसिंगजी रोडवरील कार्यालय गाठले व मांडवात बसलेल्या सहाय्यक सरव्यवस्थापकाला कपडे फाटेपर्यंत चोप दिला. सुरक्षा रक्षक मदतीला आल्याने त्याची सुटका झाली. हा प्रकार सुरू असताना आपलेही कपडे फाटतील या भितीपोटी समूह सरव्यवस्थापकाने ऑफिसमधून काढता पाय घेतला. 


'गिरे तो भी टांग उपर' या उक्तीप्रमाणे या जोडगोळीने लगेचच या ब्युरो चीफच्या जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या