औरंगाबाद - दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक यांच्यावर आज राणे समर्थकांनी हल्ला करून अंगावर शाई फेकली. एका बातमीवरून राणे समर्थकांनी कार्यालयात राडा केला.
जालना रोडवरील लोकपत्र कार्यालयात रविवारी दुपारी पाच ते सहा राणे समर्थकांनी कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक यांच्याशी हुज्जत घालून माफी मागा - माफी मागा असा गोंधळ सुरु केला आणि त्यानंतर अंगावर शाई फेकली. यावेळी एका कर्मचाऱ्याने तहकिक यांचा बचाव केला. विशेष म्हणजे राणे समर्थकांनी संपूर्ण घटनेचे व्हिडीओ शूटिंग केले आहे.
व्हिडीओ
गुन्हा दाखल
लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक यांच्यावर हल्ला करणाऱ्या राणे समर्थकांवर MIDC सिडको (औरंगाबाद शहर) पोलीस स्टेशनमध्ये कलम- 143, 147, 149, 447, 323, 504 भादवि सहकलम पत्रकार संरक्षण अधिनियम- 2017 कलम- 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी : रविंद्र विठ्ठलराव तहकीक वय51वर्षे धंदा- दैनिक लोकपत्राचे कार्यकारी संपादक रा जयभवाणी नगर गल्ली नं. 1औरंगाबाद मो न 7888030472
आरोपी- (1)गणेश उगले, (2) निलेश भोसले, (3)बाबुराव वाळेकर, (4)उमेश शिंदे व (5) अनोळखी एक नाव/पत्ता माहीत नाही.
गु.घ.ता वेळ व ठिकाण- दि.30/05/2021 रोजी 13.30 वा.सु. दैनिक लोकपत्रचे ऑफिस MIDC चिकलठाणा धुत हॉस्पीटल जवळ औरंगाबाद.
खुलासा- नमुद ता वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी हे दैनिक लोकपत्र येथे अधिकृत कार्यकारी संपादक असुन, फिर्यादी हे देनिक लोकपत्रचे ऑफिस MIDC चिकलठाणा धुत हॉस्पीटल जवळ औरंगाबाद येथे असतांना यातील नमुद आरोपीतांनी गैरकाद्याची मंडळी जमवुन फिर्यादिच्या दैनिक लोकपत्र च्या ऑफिसमध्ये फिर्यादिची परवानगी न घेता ऑफिसमध्ये घुसुन फिर्यादिस, तुम्ही तुमच्या दैनिक लोकपत्रमध्ये आमच्या राणे साहेबांच्या विरुध्द मुख्य पानावर बातमी का छापली? असे म्हणुन आरोपीतांनी फिर्यादिस शिवीगाळ केली व धक्काबुक्की धक्का बुक्की करुन तुम्ही वेश्या आहात असे म्हणुन फिर्यादिच्या अंगावर काळ्या रंगाचा पदार्थ फेकला. अशी फिर्यादीने फिर्याद दिल्यावरुन वरील नमुद कलमा प्रमाणे डिओ अधिकारी पोउपनि/ नागरे यांनी गुन्हा दाखल करुन मा.पोनिसो यांच्या आदेशाने पुढील तपास कामी स.पो.आ. सिडको विभाग भुजबऴ यांच्याकडे दिला आहे.
0 टिप्पण्या