लोकमतचा DNA होणार का ?


लोकमत हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील नामवंत वृत्तपत्र समूह आहे.पण काही अधिकारी यानी या समूहाला पोखरून टाकले आहे त्यात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग सुद्धा आहे. सप्टेंबर २०२० रोजी लॉकडाऊन मध्ये लोकमतचे प्रतिनिधी व डेपो चालक यांच्या संगनमताने पेपर न घेताच कूपन कॅश केले जायचे आणि पेपर न घेताच विक्रेत्याला २५% रक्कम व ७५% रक्कम डेपोधारक व स्थानिक लोकमत प्रतिनिधी आपसात वाटून घेत ही बाब आम्ही लोकमतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां समोर तसेच दांगट एजन्सी समोर मांडली पण त्यावर आजपर्यंत काहीही केले गेले नाही.


 माझा उद्देश लोकमत समूहाला बदनाम करणे हा नक्कीच नाही म्हणून तर आम्ही गेले ८ महिने कारवाई ची वाट बघत होतो नाईलाजास्तव हे करावे लागत आहे.या लोकमत मध्ये वार्षिक वर्गणीदार योजनेमध्ये हजारो कूपन हे लोकमत अधिकारीच विक्रेत्यांच्या नावाने पेपर न घेताच कॅश करून करोडोंचा भ्रष्टाचार करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे हा घोटाळा हे अधिकारी करतात मात्र बदनामी विक्रेत्यांची केली जाते ही गंभीर बाब आहे.


शिवाय खूपशा विक्रेत्यांना त्यांच्या हक्काची कूपन न देता ती परस्पर हे लोकमत चे अधिकारी डेपो धारकला हाताशी धरून कॅश करतात हे असे वर्षानुवर्षे चालू आहे.हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि असे घोटाळे करणाऱ्या लोकांना घरी बसवायला हवे. आत्ताच्या या प्रिंट मीडियाच्या कठीण काळात जर असे अधिकारी करोडों रुपयांचा भ्रष्टाचार करतील तर ते कंपनीसाठी नक्कीच नुकसानदायक असेल. त्यामुळे माझ्या मनाला प्रश्न पडला आहे लोकमतचा DNA होणार का?

दत्ता घाडगे

अध्यक्ष - ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन

(9594437749)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या