बॉडीबिल्डिंग मागचे काळे सत्य आणि त्यात "फेकसत्ताची" उडी


काल सकाळीच एक मराठमोळ्या बॉडी बिल्डरचा कोरोना मुळे मृत्यू झाला आणि काही वेळानंतर "फेकसत्ता" (लोकसत्ता) वाल्यांची ची बातमी आली की "आपण फिट असून आपल्याला काहीच होऊ शकत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी तुम्हाला खडबडून जाग करेल".

मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाडचं करोनामुळे निधन

मुळात ही हेडलाइनच चुकीची आहे. ह्यामुळे बऱ्याच लोकांची दिशाभूल झालेली आहे. पहिलेच घाबरलेली लोकं अजून घाबरून गेलेली आहेत की असला तगडा माणूस ह्या रोगातून वाचू शकत नाही तर आपली काय लायकी ? पण कोणी ह्या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे का ? उत्तर आहे "नाही". आजकाल लोक कोणत्याही बातम्या आल्या की धडाधड पुढे ढकलतात. ती बातमी किती खरी आहे किंवा किती खोटी हे तपासत नाहीत आणि मग ती बातमी एक वादळासारखी पसरते. असो. तरीही आज खर काय आहे हे आपण पडताळून पाहूया, तेही अगदी खोलात शिरून.


मुळात "फिट" असणे  आणि एक "प्रोफेशनल बॉडिबिल्डर" असणे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे व हा फरक जर तुम्ही समजून घेतलात तर तुमचे बॉडीबिल्डिंगशी जुडलेले सगळे  प्रश्न दूर होतील. आणि तसच, बॉडी बिल्डिंग मध्ये सुद्धा जे दोन प्रकार मोडतात ते म्हणजे "स्टिरॉइड बॉडिबिल्डर" आणि "नैसर्गिक बॉडिबिल्डर" हे सुद्धा तुम्हाला समजेल. आता तुम्हाला वर दिलेल्या फोटोमध्ये महाराष्ट्र मधील प्रसिध्द बॉडिबिल्डर दिसेल "जगदीश लाड" ज्याने बॉडिबिल्डर क्षेत्रात बरच नाव कमावले. ह्या सारखे बरेच बॉडिबिल्डर देशभरात आहेत ज्यांनी ह्या क्षेत्रात विविध बक्षीस पटकावलीत, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीला सुद्धा. पण तुम्ही कधी विचार केला का की हे लोक इतके अवाढव्य, रिप्ट, आणि दणकेस कसे दिसतात. 


आता ह्यावर मला काही लोकांचं पाणचट उत्तर मिळेल की हे लोक "पावडर" घेतात किंवा इंजेक्शन घेतात. तसे पावडर आणि इंजेक्शन मध्ये सुद्धा काश्मीर - कन्या कुमारी इतका फरक आहे. त्यावर आपण नंतर बोलू. ह्या प्रत्येक बॉडिबिल्डर मागचे सर्वात मोठे सिक्रेट आहे ते म्हणजे शरीरातील हार्मोन्स वाढवणारी बनावटी औषधं ज्याला आपण इंग्रजीत "आर्टिफिशियल मेल हार्मोन्स -  स्टिरॉइड्स" असे म्हणतो. ह्याचा शोध इ.स. १९३५ ला जर्मनी मध्ये लावला गेला (ह्यात सुद्धा तीन प्रकार असतात). 




 रुग्णाच्या लैंगिक किंवा शारीरिक समस्या सोडवण्यासाठी आणि मर्दाला मर्द बनवून ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. जस की पुरुष रुग्णामध्ये नैसर्गिक हार्मोन्सची (टेस्टोस्टेरॉन) कमतरता असते ज्याच्या मुळे टेस्टीस मध्ये शुक्राणूचे उत्पादन कमी होते जेणेकरून तो स्वतःला नपुंसक समजतो व पिता बनण्यास अडचणी येतात, अश्याना हे हार्मोन दिले जाते. ओरल फॉर्म मध्ये किंवा इंजेक्टबल फॉर्म मध्ये. त्या दशकात ह्या औषधास "अमृत" मानले जायचे, कारण ह्याचा उपयोग हाडांना लोखंडासारखे टणक बनवण्यास होतो, पचन शक्ती वाढवता येते त्यामुळे ताकद सुद्धा सामान्य माणसापेक्षा ४ पटीने जास्त व ताकद जास्त असल्या मुळे जिम मध्ये वजन सुद्धा ४ ते ५ पटीने जास्त उचलता येते  एखादा नवखा जेव्हा हे बनावटी औषध घेण्यास सुरुवात करतो तेव्हा त्याचे अंग ३ ते ४  महिन्यातच बदलते. 



पण हे त्यावर अवलंबून आहे की तो किती प्रमाणात ह्याचा वापर करतो काहीजण आठवड्याला १५० ते ३०० मिलिग्राम घेतात. त्यानंतर त्यांना अंगामध्ये एक अजब शक्ती जाणवू लागते, त्यांचे शरीराचे प्रत्येक अवयव हे उठून दिसतात अगदी फुगलेले, मोठे व पोटावर 6 पॅक अब्स, जंगली गोरीलासारखी पाठ ह्यासोबत अगांवर प्रत्येक ठिकाणी उठून आलेल्या शिरा दिसतात, चरबीचा स्तर सुद्धा कमी होतो अगदी २५ पासून १० % च्या आत जातो व हे सुद्धा अगदी ४ ते ५ महिन्याच्या कालावधीत.  शरीर एकदम उत्कृष्ट आकारामध्ये येते, म्हणून एखाद्या नवख्याला ही पहिल्यादा जादूच वाटेल. तस स्टिरॉइड मध्ये बरेच प्रकार येतात जस की ओरल मध्ये अनावर/ ऑक्सनड्रिन, विंस्ट्रोल, अनोबोल/अनाड्रॉल, डायनाबोल व इंजेक्टबल मध्ये डेका - डूराबोलीन, डेपो, equapoise आणि सर्वात खतरनाक प्रकार ज्याला स्टिरॉइड चा "राजा" मानले जाते तो म्हणजे ट्रेनबोलोन. स्पर्धेच्या काळात कटिंग साठी वापरला जाणारा जो यूजर ला एक आठवड्यात बदलण्याची शक्ती ठेवतो. 



जर रविवारी एक डोस घेतला तर शनिवार पर्यंत तुमच्या बॉडी वरील कट्स अगदी स्पष्ट पणे दिसतील आणि बायसेप व शोल्डर चा आकार सुद्धा वाढलेला असेल. आता तर हे औषध जगभरात वापरले जाते.  ह्याच औषधांनी संपूर्ण फार्मा इंडस्ट्रीचा पूर्णपणे कायापालट करून टाकला आहे. कारण ह्या गोष्टीमुळे ते करोडो रुपये कमावतात. त्यात बॉडिबिल्डिंग इंडस्ट्रीही दिवसेंदिवस पसरत आहे. ह्यासर्व स्टिरॉइड्स वापराबद्दल बॉडिबिल्डर नेहमीच मौन धारण करतात. ते कधीही खर बोलत नाहीत. अगदी मुलाखतीत सुद्धा १०० लोकांसमोर रेटून खोट बोलतात कारण त्यामागे इज्जतीचे धिंडवडे उडण्याचा प्रश्न असतो.


आता वरील सर्व माहिती वाचून तुम्हाला समजले असेलच की हे लोक इतके राक्षसी कसे दिसतात. पण तुम्ही ह्या स्टीरॉइड्स ची दुसरी बाजू म्हणजेच "काळे सत्य" जाणून घेण्याचा प्रयत्न केला का ? ह्यामागचे सुद्धा उत्तर आहे "नाही". आणि जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला धक्का लागेल कारण स्टिरॉइड्स जितकं तुम्हाला देतात त्यापेक्षा जास्त ते तुमच्या कडून हिरावून घेतात. ते म्हणजे तुमचं "आरोग्य". कारण स्टिरॉइड्स चे दुष्परिणाम सुद्धा बरेच आहेत. ही तुमची पचन शक्ती नक्की वाढवतात पण दुसऱ्या बाजूला, तुमच्या यकृत, किडनी, आतडे आणि हृदयाला कायमस्वरूपी हानी पोचवतात, जेणेकरून तुमचे शरीर आतल्या आत पोखरत जाते, तसेच पाठीवर मोठंमोठे फोड येणे, पोटावर कायमस्वरूपी स्ट्रेच मार्क येणे, कातडी लाल पडणे, छोट्या गोष्टींची चीड येणे. असल्या काही दुष्परिणामामुळे वापरकर्ता हृदय - विकाराच्या झटक्याने दगावतो सुद्धा. आतापर्यंत देश विदेशातील बरेच बॉडिबिल्डर ह्या कारणाने मृत्युमुखी पडलेत तर काहींनी वेड होऊन स्वतःच्याच आई वडिलांचा खून केला आहे तर कोणी बायकोचा खून केला आहे.



 पण बरेच असेही बॉडिबिल्डर आहेत की ज्यांना ह्या औषधपासून जराही नुकसान झालेले नाही ह्यामागचे कारण आहे "पैसा". जो बॉडिबिल्डर स्टिरॉइड्स वापरतो त्याचा महिन्याचा खर्च २ ते ३ लाख असतो. त्याला विविध डॉक्टरचे सल्ले घ्यावे लागतात. प्रत्येक महिन्याला, जमल्यास आठवड्याला, रक्त चाचणी घ्यावी लागते ज्यात त्याला त्याच्या रक्तातील "विषाचे" प्रमाण किती आहे कळते. कारण हेच विष रक्तात शुगर वाढवते त्यामुळे वेळीस इन्सुलिन घ्यावे लागते अन्यथा डायबेटीसला सामोरे जावे लागते. हेच विष त्याला नुकसान पोहचवत असते म्हणून त्याचा खर्च वेगळा करावा लागतो. हे सांगण्या मागचा उद्देश असा आहे की बॉडीबिल्डिंग क्षेत्र फक्त श्रीमंतांचे खेळ आहेत. गरीब व मध्यम वर्गाने ह्यापासून लांब राहिलेले बरे कारण महिन्याला खर्च परवडणारा नसतो आणि पैसा खर्च केलाच तर स्वतःला ला बर करण्यासाठी वेगळा पैसा ओतावा लागतो. आजकाल सामान्य वर्गातील किशोरवयीन पोर सिक्स पॅक बनवण्यासाठी ह्या औषधांचा स्वतःला वाटेल त्या हिशोबाने, कोणत्याही डॉक्टरचा सल्ला न घेता, गैरवापर करतात. परिणामी शरीराला दुष्परिणाम भोगावे लागतात. कधी तर तर ही पोरं २ - ३ महिन्यात मृत्युमुखी पडतात आणि घरचे डोक्यावर हात मारून बसतात. 


आता वरील सगळी बॉडिबिल्डिंगच्या खोलातील माहिती  वाचून  आपल्याला समजले असेलच की "फिट असणे" आणि प्रोफेशनल बॉडिबिल्डिंगचा काडीमात्र संबंध नाहीये. मुळातच फिट राहणे म्हणजे रोज व्यायाम करणे, घरचे शुद्ध जेवणाचे सेवन करणे आणि पोटावर चरबी न वाढवता अंगाला एक मर्यादित आकार देणे, कोणतेही विष शरीरात न टाकणे ज्याला आपण "नैसर्गिक बॉडिबिल्डिंग" असे म्हणतो. ह्याचं उत्तम उदाहरण द्यायचे झाले कोल्हापूरचे व देशातील विविध भागांतील पैलवान जे १०० ते ११० किलो पर्यंत वजनदार असतात. ह्यांच्या रोगप्रतिकार शक्तीची तुलना आपण सामान्य माणसाशी नाही करू शकत. बहुतेक आजार ह्या पैलवनापासून लांबच राहतात म्हणून हो ! माझ्या हिशोबाने हेच लोक "फिट" असतात. फरक इतकाच की हे पैलवान कुस्ती लढतात आणि ह्याउलट, बॉडिबिल्डर स्टेजवर त्यांच्या बाह्य - अवयवांचे प्रदर्शन करतात. दोन्ही क्षेत्र वेगळी आहेत पण एक गोष्ट कॉमन आहे की अवयवांना पिळदार बनवून शक्ती वाढवणे. त्यात नैसर्गिक बॉडीबिल्डरचे शरीर तितके प्रभावित करणारे नसते जितके स्टिरॉईड बॉडीबिल्डरचे असते. म्हणून लोक नैसर्गिक बॉडीबिल्डर कडे जास्त लक्ष देत नाही कारण त्यांना हवे असतात मासाने भरलेले मोठमोठे राक्षस. त्यामुळे नैसर्गिक बॉडी बिल्डिंग च्या स्पर्धेला जास्त महत्व नसते, ह्या स्पर्धा शक्यतो लोकल एरियात लढल्या जातात. 


आता आपण मूळ मुद्यावर येऊ. ज्या मराठमोळ्या बॉडीबिल्डर जगदीश लाडचे दुःखद निधन झाले त्यामागचे कारण म्हणजे तो कधीही फिट नव्हता. त्याची रोगप्रतिकार शक्ति इतकी नव्हती की ह्या आजाराला व हायड्रोक्लोरोऑक्सिक्वीनचे जड डोसेज झेलू शकेल. कारण त्याने आधीच स्टिरॉइड्सचे उच्च प्रमाणात सेवन करून स्वतःच्या शरीलला आतून खराब करून टाकले होते म्हणून तो मृत्यूमुखी पडला. ह्याउलट एखादा सामान्य तंदुरुस्त माणूस ७ ते ८ दिवसात ठणठणीत बरा होऊन पूर्वस्थितीत परत येईल कारण तो कोणत्याही प्रकारचे विष स्वतःमध्ये टाकत नाही. (अगदी ११० वर्षांच्या आजीने सुद्धा कोरोनवर मात केली).  


इतकं मोठ "काळ सत्य" ह्या बातमी मागे असूनही फेकसत्ता वाल्यानी निर्लज्जपणे बातमी काय दिली की तुम्ही "फिट असलात तर तुम्हाला काही होऊ शकत नाही अस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खूप मोठया गैरसमजात आहात". तुमच्या असल्या टूक्कार पत्रकारितेमुळे लोक धक्क्यात आहेत. तुम्ही खोट्या राजकीय बातम्या देण्यात सरस आहातच पण आता दुसऱ्या क्षेत्रातील खोट्या बातम्या देऊन तुम्ही लोकांच्या मनात धडकी भरवण्यात सुद्धा मागे नाही. थोडी तरी लाज बाळगून, जरा माहिती काढून, तुम्ही बातमी दिली असती तर आज सामान्य जनता चिंतेत नसती. आज एकतर देशभरात कोरोनाच्या तांडवने थैमान घातले आहे आणि तुम्ही मूर्खासारखे खोट्या बातम्या देऊन लोकांचे मानसिक खच्चीकरण करत आहात. जरा माणुसकी शिल्लक असेल तर लाज बाळगा जी तुम्हाला कधीच नव्हती.


मित्रानो जर तुम्ही हा लेख वाचला असेल तर जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि सर्वांना बॉडीबिल्डिंग च्या मागचे काळ रहस्य आणि फेकसत्ताचा निर्लज्जपणा दिसू द्या. 


सुमित पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या