जेष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन म्हणून चालवली खोटी बातमी;
पाटील यांची प्रकृती ठणठणीत
मुंबई - टीव्ही 9 मराठीने पुन्हा एकदा कडक गांजा पिऊन ब्रेकिंगच्या नादात एका जेष्ठ नेत्याच्या निधनाची चुकीची बातमी दिली. जेष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची प्रकृती ठणठणीत असताना बेजबाबदारपणे त्यांचे निधन म्हणून बातमी चालवली.
प्रा.डॉ. एन. डी. पाटील हे कोरोनाला हरवून रविवारी रुग्णालयातून घरी आले आहेत. त्यांच्या लग्नाचा सोमवारी हिरकमहोत्सवी वाढदिवस होता. रात्री आठ वाजता नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी दूध घेतले आणि झोपी गेले. अचानक रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या निधनाबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर लगेच टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते एन. डी. पाटील यांचे निधन म्हणून ब्रेकिंग न्यूज दिली. त्यामुळे चौकशीसाठी फोन खणखणू लागले.
दरम्यान, जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती उत्तम असून ते दूध पिऊन झोपले असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सरोज उर्फ माई पाटील यांनी सोमवारी रात्री प्रसार माध्यमांना दिली.
टीव्ही 9 मराठीने शहानिशा न करताच सोशल मीडियाच्या आधारे बेजबाबदारपणे चुकीची बातमी दिली. या प्रकारात पाटील यांच्या कुटुंबियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
![]() |
हीच ती खोटी बातमी |
0 टिप्पण्या