औरंगाबादेत पाटील तर नागपुरात माने यांनी "लोकमत" चा पदभार स्वीकारला

औरंगाबाद / नागपूर -  औरंगाबादेत सुधीर महाजन यांना तर नागपुरात दिलीप तिखिले यांना नारळ देण्यात आल्यानंतर औरंगाबादेत नंदकिशोर पाटील यांनी तर नागपुरात श्रीमंत माने यांनी "लोकमत" चा पदभार स्वीकारला आहे. 


सुधीर महाजन यांना सेवानिवृत्तीनंतर दोनदा मुदतवाढ मिळाली होती तर तिखिले यांना एक वेळा मुदतवाढ मिळाली होती. महाजन यांनी एक रुपया मानधनावर काम करण्याची इच्छा व्यक्त करूनही करण आणि ऋषी दर्डा बंधूनी महाजन यांना अखेर भावपूर्ण निरोप दिला. 

औरंगाबाद मध्ये सुधीर महाजन यांच्याकडून पदभार  स्वीकारताना संपादक नंदकिशोर पाटील
औरंगाबाद मध्ये सुधीर महाजन यांच्याकडून पदभार  स्वीकारताना संपादक नंदकिशोर पाटील 



औरंगाबादेत नंदकिशोर पाटील यांनी पदभार स्वीकारताना एडिटर इन  चीफ राजेंद्र दर्डा,  संचालक करण दर्डा , बालाजी मुळे, ओमप्रकाश केला , संपादक चक्रधर दळवी आदी उपस्थित होते. 


औरंगाबाद, जालना आणि तीन जिल्ह्यासाठी नंदकिशोर पाटील यांच्याकडे पदभार आहे. अमरावती आवृत्तीचा पदभार गजानन चोपडे यांच्याकडे तीन जिल्ह्याचा आहे, तर विदर्भातील उर्वरित पाच जिल्ह्यासाठी श्रीमंत माने यांच्याकडे पदभार आहे. 

नागपूर मध्ये दिलीप तिखिले यांच्याकडून पदभार स्वीकारताना संपादक श्रीमंत माने...


औरंगाबाद आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटील हे मूळचे औसा -लातूरचे आहेत. सुरुवातीला लातूरच्या एकमतमध्ये उपसंपादक , निवासी संपादक म्हणून काम केल्यानंतर नगर लोकमतमध्ये निवासी संपादक म्हणून काम केले, नंतर मुंबईला कार्यकारी संपादक म्हणून बदली झाली होती. त्यांना औरंगाबादमध्ये संपादक म्हणून संधी मिळाली आहे. 


दरम्यान, बेरक्याचे वृत्त खरे ठरले आहे. नांदेडचे विशाल सोनटक्के यांची यवतमाळला डेप्युटी न्यूज एडिटर म्हणून बदली झाली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या