‘गोमन्तक’च्या संपादक-संचालकपदी राजू नायक नियुक्त



पणजी -  ज्येष्ठ पत्रकार राजू नायक यांनी सोमवारी ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक म्हणून सूत्रे स्वीकारली. ४० वर्षे पत्रकारितेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या नायक यांनी मुंबई आणि गोव्यातील नामांकित वृत्तपत्रांमध्ये काम केले आहे.


मराठी, इंग्रजी आणि कोंकणी वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर काम केलेल्या नायक यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते स्वत:ला पर्यावरण पत्रकार मानतात. त्यांची पर्यावरणावरील तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गोव्याच्या खाण व्यवसायावरील त्यांचे ‘खंदक’ हे या मालिकेतील वैशिष्‍ट्यपूर्ण पुस्तक मानले जाते. नायक हे दिल्लीस्थित सीएसई या संस्थेचे फेलो असून, त्यांनी गोव्यातील खाण व्यवसायाचा अभ्यास केला आहे.


राजू नायक यांनी यापूर्वी दै. सकाळ, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस आणि टाइम्स ऑफ इंडिया आदी प्रतिष्ठित दैनिकांत उल्लेखनीय काम केले आहे. त्यांना गोव्यातील पुरस्कारांसह महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आचार्य अत्रे हा पुरस्काराही लाभला आहे. 


राजू नायक हे गोव्याच्या विद्यार्थी चळवळीत होते. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक सामाजिक कार्यातही सक्रियतेने भाग घेतला आहे. गोव्यात पथनाट्याची सुरुवातही त्यांनीच केली होती.

Post a Comment

0 Comments