पद्मश्रींच्या कार्यालयातच संपादकांची डुलकी

दीड वर्षांपूर्वीचा फोटो छापला पहिल्या पानावर




पद्मश्रींच्या कोल्हापूर कार्यालयातील संपादक डुलकी घेत काम करत आहेत.  दीड वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीचा फोटो बुधवारच्या कोल्हापूर- सांगली आवृत्तीला पहिल्या पानावर प्रसिद्ध केला आहे.


मंगळवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीची बातमी सर्वच वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध केली आहे. मात्र, पद्मश्रींच्या कोल्हापूर आणि सांगली आवृत्तीला या बातमीत गेल्या वर्षी म्हणजेच २१ फेब्रुवारी २०२० रोजी या दोघांत झालेल्या भेटीचा फोटो वापरला आहे. या फोटोत दोघांनीही मास्क घातलेला नाही. फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दाढीही छोटी आहे. नरेंद्र मोदी यांनी सध्या रविंद्रनाथ टागोर यांच्यासारखी मोठी दाढी राखली आहे. यातून फोटो कधीचा आहे, हे समजू शकते. मात्र, रात्रपाळीत संपादकांनी डुलकी घेतल्याने चुकीचा फोटो छापून आला आहे. पान एकचे काम समूह संपादक, कार्यकारी संपादक किंवा सहयोगी संपादक बघतात. एवढे दिग्गज असतानाही गडबड झाली आहे.


'चुकीला माफी नाही' या म्हणीमाणे पद्मश्रींच्या कार्यालयाचा कारभार चालत होता. चूक झाल्यास पगार कापला जायचा, त्यामुळे डोळ्यात तेल घालून काम केलं जायचे. आवडते आणि नावडते अशी कर्मचाऱ्यांची वर्गवारी झाली आहे. नावडते कर्मचारी हिटलिस्टवर तर आवडते कानाशी असतात. ते काम न करता फक्त बसून बत्ती लावतात. त्यामुळे पद्मश्री आणि दादांच्या खालच्या मजल्यावर बेबंदशाही कारभार सुरू आहे. पण यात सुधारणा कोण करणार असा प्रश्न प्रामाणिक कर्मचाऱ्यांना पडतो आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या