मुदतवाढ मिळालेल्या लोकमतच्या तीन संपादकांना नारळ

मराठवाड्यातील तीन आवृत्तीला स्वतंत्र प्रमुख 


औरंगाबाद - महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून बिरुद मिरवणाऱ्या लोकमतची सूत्रे राजेंद्र दर्डा यांचे पुत्र करण आणि ऋषी दर्डा यांच्याकडे गेल्यानंतर तरुण नेतृत्वाला वाव देण्यात आला आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर मुदतवाढ देण्यात आलेल्या महाराष्ट्रातील मराठवाडा (औरंगाबाद), नागपूर आणि गोवा आवृत्तीच्या संपादकांना नारळ देण्यात आला आहे तसेच मराठवाड्यात तीन वेगवेगळ्या आवृत्तीला तीन वेगवेगळे प्रमुख नेमण्यात आले आहेत. 


मराठवाडयातील तिन्ही आवृत्तीच्या संपादकपदाची सूत्रे गेले अनेक वर्षे सुधीर महाजन यांच्याकडे होती. ते दोन वर्षांपूर्वी निवृत्त होवूनही त्यांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. यंदा मात्र नारळ देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील तीन आवृत्तीला स्वतंत्र प्रमुख नियुक्त कऱण्यात आले आहेत. औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्याची एक आवृत्ती राहणार असून, या आवृत्तीच्या संपादकपदी नंदकिशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील ७ जून रोजी पदभार स्वीकारणार आहेत. 


औरंगाबाद आवृत्तीच्या संपादक पदासाठी धनंजय लांबे यांचे  नाव चर्चेत होते. पण लांबेला लांब ठेवत 'तिरुपती'च्या  कृपेने मुंबईत डेक्सवर बसलेल्या नंदकिशोर पाटील यांना संधी मिळाली. तिकडे मुंबईत विनायक पात्रुडकर मुंबई सेंट्रल डेक्सबरोबर मुंबई आवृत्तीचा अतिरिक्त कारभार पाहणार आहेत. 


नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्याची एक आवृत्ती राहणार असून, या आवृत्तीच्या वृत्तसंपादकपदी राजेश निस्ताने  यांच्याकडे स्वतंत्र पदभार सोपवण्यात आला आहे. नांदेडचे जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के यांची पदोन्नतीवर यवतमाळला बदली होण्याची शक्यता आहे. निस्ताने पूर्वी यवतमाळला होते. 


लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्याची स्वतंत्र आवृत्ती राहणार असून, या आवृत्तीचा स्वतंत्र पदभार डेप्युटी न्यूज एडिटर धर्मराज हल्लाळे यांच्याकडे राहणार आहे. ऋषी बाबूच्या कृपेमुळे हल्लाळेने लातुरात आपले बस्तान चांगलेच बसवले आहे. 


नागपूरचे मुदतवाढ मिळालेले संपादक दिलीप तिखिले यांना देखील नारळ देण्यात आला असून, श्रीमंत माने यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. तसेच अमरावतीचे गणेश देशमुख यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे. अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या तीन जिल्ह्याच्या अमरावती संपादकीय युनिटचा स्वतंत्र पदभार गजानन चोपडे यांच्याकडे देण्यात आला आहे. चोपडे पूर्वी नागपूरला होते. 

गोवा आवृत्तीचे राजू नायक आपल्या टीमसह गोमंतक जॉईन केले आहे. त्यामुळे गोव्यात लोकमतची मोठी अडचण निर्माण झाली आहे. 


# लोकमतचे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना  सन्मानाने निवृत्त करण्यात  आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या