काळजी तुमची चॅनल मध्ये कोरोनाचा चौथा बळी


काळजी तुमची , हित  महाराष्ट्राचं  चॅनलच्या  व्हिडिओ एडिटर्सचे हेड असलेल्या अब्बास यांचं कोरोनामुळे निधन झालं. मागील एका वर्षात चौघांनी कोरोनामुळे जीव गमावला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत चॅनेलमधल्या ६० जणांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. 


संपादक कमकुवत याने सर्व स्टाफ बळजबरीनं ऑफिसमध्ये थांबायला लावलं होतं. जवळपास एक महिना सर्व जण ऑफिसमध्ये होते. ताप असला तरी घरी सोडलं जात नव्हतं. अखेर एका महिन्यानंतर जास्त जणांना ताप येऊन लागला, प्रकृती खराब होऊ लागली त्यामुळे सुटका झाली. पण तो पर्यंत कोरोना पसरला होता. 


आता एका वर्षानंतरही पुन्हा १५ ते २० जणांना कोरोना झाला आहे. इतर चॅनेल्स कर्मचाऱ्यांची ज्या प्रमाणात काळजी घेतात तशी काळजी इथं घेतली जात नाही. संपादक कमकुवत, मॅकमोहन आणि हाफ मॅड गँग यांच्यामुळे चॅनल प्रचंड बदनाम झालं आहे. बदनाम झालेलं हे चॅनेल अजून किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या