राज्य DGIPR मधील ५ वरिष्ठ आजी-माजी अधिकारी आणि 'उजडा चमन' संपादक रडारवर

राज्य DGIPR मधील झारीतील शुक्राचार्य आणि मीडियातील शकुनी मामाची जेलवारी नक्की... 'पेगासस' हेरगिरी प्रकरण, वादग्रस्त इस्त्राईल दौरा, DGIPR मधील आर्थिक गैरव्यवहारांची सखोल चौकशी सुरू


मुंबई - 'पेगासस" हेरगिरी प्रकरणावरून सध्या स़ंसदेत रणकंदण सुरू आहे. आता त्याचे परिणाम आणि हादरे महाराष्ट्रातही बसू लागलेत. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे राज्य DGIPR मधील ५ वरीष्ठ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी राज्यसरकारने सुरू केलीय. या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी १४ नोव्हेंबर २०१९ इस्त्राईलचा वादग्रस्त दौरा केला होता. त्याची खमंग चर्चा त्यावेळीही माध्यमांमध्ये झाली होती. आत तर त्या षडयंत्री दौऱ्याची चौकशी सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू झालीय. 


कारण या षडयंत्री प्रकरणात 'पेगासस' हेरगिरी तर आहेच, त्या शिवाय राज्याच्या तीजोरीत करदात्यांनी भरलेल्या ५० लाख रुपयांची उधळपट्टी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या वादग्रस्त १० दिवसांच्या दौऱ्यात कशी केली त्याची खमंग चर्चा सध्या जोरात सुरू आहे. कारण या दौऱ्यात DGIPR चे ५ वरिष्ठ अधिकारी तर होतेच त्या बरोबर एका इंटर्न मुलीचाही समावेश होता. आता या इंटर्न मुलीचा समावेश या वादग्रस्त दौऱ्यात कसा काय झाला ? याचीही तपशिलवार चर्चा सध्या सुरू आहे. तसेच राज्य DGIPR मधील बेकायदेशिर राजकीय नियुक्त्या यावर तर मागच्या सरकारच्यावेळीच IAS विरुद्ध IPS लॉबी एकमेकांना भिडले होते. प्रशासनातील या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शितयुद्धाचा भडका, आता पुन्हा एकदा या ५ अधिकाऱ्यांच्या चौकशीवरून चव्हाटयावर आलाय. 


वरीष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार हे चौकशी प्रकरण साधं नसून अगदी खोलात जाऊन सर्वांचीच पोलखोल करणारी चौकशी असल्याची माहिती मिळतेय. या चौकशीत 'पेगासस' हेरगिरी प्रकरणासोबत DGIPR मधील वरिष्ठ आजी-माजी अधिकारी आणि त्यांच्या अधिकृत आणि अनधिकृत पत्नींच्या नावे मिळवलेली कंत्राटी निविदा आणि त्यातून निर्माण केलेला मोठा आर्थिक गैरव्यवहाराचीही सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती मिळतेय. 


DGIPR मधील या आर्थिक गैरव्यवहार चौकशी प्रकरणात एका मराठी वृत्तवाहिनीच्या 'उजडा चमन' बोगस संपादकाचाही नाव असल्याचं खात्रीलायक माहिती समोर आलीय. त्यामुळे पैशांसाठी 'चाटिलकी' करणारा हा बोगस 'उजडा चमन' संपादक आता गॅसवर गेलाय. चौकशी प्रकरणात त्याने केलेला आर्थिक गैरव्यवहार उघड होणार हे नक्की आणि त्याला कोणत्याही क्षणी अटक होणार हे सांगायला आता कुणाही ज्योतीषाची गरज नाही. त्यामुळे सदर 'उजडा चमन' बोगस संपादक स्वतःची अटक टाळण्यासाठी बोरिवलीकर मालकाचे तळवे सवयी प्रमाणे चाटत आहे. 


DGIPR मधील त्याचा गॉडफादर या संपुर्ण चौकशी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्यामुळे तोही आता या बोगस संपादकाला स्वतःचा आणि आपल्या पत्नीचा बचाव करण्यासाठी फाट्यावर मारत असल्याची माहीती त्यांच्याच गोटातून मिळतेय. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्य DGIPR मधील 'पेगासस' हेरगिरी प्रकरणात अडकलेले षडयंत्री आजी-माजी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या अधिकृत आणि अनधिकृत पत्नी तसेच एका मराठी वृत्तवाहीनीचा 'उजडा चमन' बोगस संपादक जेलमध्ये जाणार हे आता स्पष्ट झालंय. राज्य DGIPR मधील या आजी-माजी षडयंत्री अधिकाऱ्यां विरोधात उशिरा का होईना पण आता महाविकास आघाडी सरकारने कडक पाऊल उचलंय. त्यामुळे राज्य DGIPR मधील झारीतील शुक्राचार्य आणि मीडियातील शकुनी मामाचं आता काही खरं नाही. हे  नक्की. 

Post a Comment

0 Comments