पुणे - पुण्यातील एका हॉटेल आणि परमिट रूम मध्ये जावून पाच हजाराची खंडणी मागणाऱ्या दोन वेब पोर्टलच्या कथित खंडणीखोर पत्रकारांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यातील शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौका एका हॉटेल आणि परमिट रूममध्ये एका महिलेसह दोन वेब पोर्टलमध्ये पत्रकार घुसले आणि पाच हजाराची खंडणी मागू लागले. आपण गुन्हेगारीविषयक बातम्या देतो असे सांगून त्यांनी मालकाला दमदाटी सुरु केली.
यापूर्वी या हॉटेल मालकाने एक हजार रुपये दिले होते. सततच्या पैश्याच्या मागणीमुळे त्यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.लक्ष्मीकांत पोहोडे ( वय ३०, रा फातिमानगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सतपाल सिंग अमरसिंग बग्गा ( वय ५७, रा. वाघोली ) आजलोंना प्रमोद जयस्वाल ( वय ३५, रा. ताडीवाला रोड ) या बोगस पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
0 टिप्पण्या