पद्मश्रींच्या सोलापूर आवृत्तीची घसरण थांबेना !


पद्मश्रींच्या पेपरची सोलापूर आवृत्तीची घसरण काही केल्या थांबत नाही.पेपरला मागील 10 वर्षात स्थानिक न्यूज ब्युरो चीफ मिळालेला नाही. कधी मुंबई, कधी नगर, कधी सातारा तर कधी सांगलीहून आणून न्यूज ब्युरो चीफ बसवले जातात. परिणामी पेपरची लोकल नाळ जुळत नाही. उंटावरून शेळ्या राखणारे ब्युरो आल्याने मागील काही वर्षांपासून पेपरची रोज घसरण सुरू आहे. यातून सावरण्यासाठी कसलेही नियोजन दिसत नाही. सोलापूर आवृत्तीच्या अंकवाढीचा एकही दिवस उगवत नाही. एवढ्या चिंताजनक अवस्थेत सोलापूर आवृत्ती पोहोचली आहे. 


नुकतेच सोलापूर येथील वृत्त संपादकानी राजीनामा दिला असून स्वतःचे सायंदैनिक सुरू केले आहे. पेपरची सोलापूर शहरातील अवस्था बघून चांगले रिपोर्टर येत नाहीत, आलेले ही टिकत नाहीत, त्यामुळे सध्या सोलापूर आवृत्तीची परिस्थिती दिवसेंदिवस नाजूक होत चालली आहे. सांगलीहून आलेले अमृत काही पेपरला नवजीवन देऊ शकले नाहीत असे दिसते. उलट प्रशांत माने यांच्या सारख्या जेष्ठ  रिपोर्टर नी राजीनामा देणे पसंत केले. पद्मश्री तब्येतीच्या कारणांमुळे विश्रांती घेत आहेत तर धाकट्या मालकांची कमांड अजूनही बसलेली नाही असे दिसते. त्यामुळे सध्या पद्मश्री च्या पेपरची सोलापूर आवृत्ती कोमात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या