"सोलापुरी ओबामा"चे पंख छाटले; आता वीकेंडला औरंगाबादेतच मुक्काम !



• गेले काही दिवस फारच मोकाट सुटलेल्या "सोलापुरी ओबामा"चे पंख अखेर छाटण्यात आले आहेत. तिकडे मुंबई, कोकणात "राडा" सुरु असताना अंगात साहित्यिक-संपादक "संचार"लेले महोदय इकडे जालना रोडवर अक्कलेचे तारे तोडत होते. शेवटी "भोपाळशेठ"ने या महोदयांचा सुंता केलाच. 


आपणच जणू सारा गाडा हाकीत आहोत, या भ्रमात असलेल्या या तथाकथित विद्वानांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे.आता शनिवारी आणि रविवारी पुणे-मुंबई वाऱ्या बंद !! औरंगाबादेत थांबायचे, अशी तंबी या महोदयांना देण्यात आली आहे. मदिरा आणि मदिराक्षी यापायी सोलापूर सोडून व्हाया अकोला,पुणे, अलिबाग, मुंबई  करून औरंगाबाद  गाठलेला हा गडी आता पन्नाशीच्या उंबरठयावर आहे. मात्र, अजूनही तो रागेलपणा आणि रंगेलपणा सोडायला तयार नाही. 


एकतर धड आपल्या प्रॉडक्टमध्ये लक्ष नाही, त्यात पत्रपंडित भूमिका... बाहेर मिरवायला हवे; पण प्रॉडक्शनवर नजर नको, हे काही मालक फार दिवस खपवून घेणार नाही. वर कुणी "दारूकामा"त सहभागी झाला नाही, तर साहेबांचा शेंडा गरम ! पत्रकारितेत हे निश्चितच "निषित" (निषेधार्ह) आहे. रोज सकाळी चहासोबत "पारले-G" झाल्याशिवाय ते कळायचे नाही. भलत्याच ठिकाणी, भलताच इगो केला की मग पोपट होतो. 


हातचे सोडून मग कुठे "पुण्य" मिळते का एखाद्या "नगरी"त ते चाचपडत बसावे लागते. अर्थात स्वतःचे अवडंबर माजविण्यात कुणी कितीही "प्रवीण" असला तरी ते काही एखाद्या दुकानात जाऊन "अरविंद" मिल्सचा कपडा घेण्याएव्हढे सोपे नक्कीच नाही. तुमची "रास" आणि "लीला" साऱ्या पत्रकारिता जगाला माहिती आहेत. तुम्ही भलेही कितीही पुरोगामी चेहरा जगासमोर न्या; पण "अंबिका"मातेचा कितीही पाया पडला तरी तुमचे पुनर्वसन आता व्हायचे नाही. "नाकापेक्षा मोती जड" हवाय कुणाला? 

आता वृत्तपत्रातील शेठ मंडळींनाही कुणीतरी "विवेक" शाबूत असलेला हवाय, जो "गिरधर" गोपाळाप्रमाणे पूर्ण निष्ठेने सर्व आवृत्त्यांचा भार सहज पेलू शकेल. नुसतेच भाषणे ठोकणे आणि चमकोगिरी करणे, प्रत्यक्षात एडिटोरियल प्रॉडक्शनचा "दीपक" दुसऱ्याच्याच हाती सोपवून शेठला "पटविणे" काही तेव्हढे सोपे नाही. देव "महेश"ही सांगेल की मालक काही "फलटण"हून आलेला चुतिया नाही. त्यालाही एक दिवस तुमची थेरे कळणारच ! 

थोडक्यात, जसे राणे कोकणात आपटले तसे इकडे भोपाळशेठच्या दैनिकात काही "आवटले" आहेत. आता कोल्ह्याला द्राक्षे आंबट तसे, काही महाभाग हिंदीवाल्यांना मराठी पत्रकारिता काही कळत नाही म्हणत मुंबई "नगरी"त काही "पुण्य" गाठीशी बांधले जाते का, यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. तुम्ही म्हणाल, पुरोगामी मंडळी आणि देव? अहो, काही सांगू नका ... 

जमाना लै भंपक झालाय. कधीकाळी सत्यमेव "जयंते" म्हणत ज्यांनी कोकणात लफडी केली, त्यांनीच नंतर सारसबागेत महिला सक्षमीकरणासाठी शपथेची नाटकेही रचली. अर्थात पद्मश्री हुशार आणि त्याहून हुशार त्यांचे चिरंजीव. त्यांनी चव ओळखली. हे सारे महिला "मित्रमंडळ"च त्यांनी पार "वेश्वी"बाहेर हाकलून दिले. आता औरंगाबादेत गपगुमान पडून राहण्याशिवाय उरलेय काय हाती? तिकडे राणे खान्देशातल्या गुलाबरावांना नडले, त्यांचा गेम झाला. आणि आता इकडे .......?

तात्पर्य काय, बहिणाबाईंच्या शैलीत मांडायचे तर -

जे तुम्हले भेटणार नाही पुऱ्या दुनियामा, 

ते तूम्हले भेटी खान्देशमा !

अर्थात, जे तुम्हाला साऱ्या जगात कुठे भेटणार नाही, ते खान्देशात भेटेल. सो, खान्देश आणि खान्देशींचा नाद करायचा नाही. केलात, तर मग बाराच्या भावात जाल. पेठे आणि नसले बंधूंची शेंगदाणा चटणी ज्वारी-बाजरीच्या कडक भाकरीसोबत खात बसावे लागेल नाहीतर, ‘घुंगरू’ शेंगदाणे आणि लांबोटी चिवडा खात 'जय शंकर'चे भजन आळवत बसावे लागेल!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या