न्यूज १८-लोकमत वृत्तवाहिनीचे कॅमेरामन प्रमोद सौंदडे यांचे म्युकर मायकोसिसने निधनकोल्हापूर - आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीचा कोल्हापूर येथील कॅमेरामन प्रमोद तातोबा सौंदडे ( वय ३४ ) यांचे सोमवारी सकाळी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात म्युकर मायकोसिस निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,आई व दोन  लहान मुले व एक मोठा भाऊ असा परिवार आहे. 


बारा वर्षांपूर्वी प्रमोद यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिन्यांनीतून कामाला सुरुवात केली, यानंतर आयबीएन-लोकमत या वृत्तवाहिनीचा कॅमेरामन म्हणून रुजू झाले होते .इलेक्ट्रॉनिक माध्यम हे कॅमेराशिवाय घडलेल्या घटनेची बातमी बोलकी होत नसते,शिवाय घटनेची तीव्रता लोकांसमोर येत नाही, प्रमोद याच्याकडे घडलेली घटना आणि त्याचे व्हिडिओ चित्रण कल्पकतेने टिपण्याचे कौशल्य होते . त्याने अनेक घटनांची दृश्ये  चांगल्या पद्धतीने कॅमेराबद्ध करून समाजासमोर आणली. 


या कामगिरीमुळेच त्यांना कोल्हापूर प्रेस क्लब ने उत्कृष्ट कॅमेरामन या पुरस्काराने सलग दोनदा गौरवले होते. प्रमोद सौंदडे  यांचा स्वभाव मनमिळावू होता. त्याच्या या अकाली एक्झिटमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माध्यमांमध्येही त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.


अतिशय गरीब परिस्थिती


प्रमोदची आर्थिक परिस्थिती अंत्यंत हलाखीची होती. गेले काही दिवस त्याच्यावर कोडोली येथे उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला पुण्याला हलविण्यास सांगितले होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कोल्हापूर प्रेस क्लबच्या माध्यमातून कोल्हापूरच्या पत्रकारांनी त्याला आर्थिक मदत दिली होती. तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्यावरील उपचारासाठी पुढाकार घेतला होता. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


मृतदेह गावी आणण्यासाठी ही त्याचा भाऊ अनिलकडे काहीच पैसे नव्हते. पुणे सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी तातडीने ५००० रुपये ट्रान्सफर केले. तर सम्राट यांच्या प्रयत्नांमूळे रुग्णालयाचे बिल कमी करण्यात आले.प्रमोदचा मृतदेह आणण्यासाठी पुण्याच्या महापौरांनी सहकार्य केल.


Post a Comment

0 Comments