महाराष्ट्राचा मानबिंदूच्या कोल्हापूर आवृत्तीने शोध पत्रकारितेची व्याख्याच बदलली असून कार्यालयात बसून मोठ्या प्रमाणात टेबल न्यूज दिल्या जात आहेत. एकच बातमी डेटलाईन/बायलाईन बदलून वेगवेगळ्या जिल्ह्यात वापरल्या जात आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे.
मानबिंदूला बातम्या मिळत नाहीत म्हणून हा प्रकार सुरू आहे का? अशी चर्चा आहे. एकतर ग्रामीण भागातील वार्ताहर अत्यल्प मानधनावर काम करतात. बातम्या लागत नाहीत अशी त्यांची तक्रार असते. मात्र त्यांना न्याय देण्याऐवजी टेबल न्यूजचा बोगस कारभार सुरू आहे. यातून त्यांना काय साध्य करायचे आहे, हाही शोध पत्रकारितेचा विषय आहे. मानबिंदूच्या हॅलो कोल्हापूर, हॅलो सांगली, हॅलो साताराला प्रसिद्ध झालेली आणि एस. टी. महामंडळाला टार्गेट केलेली बातमी.
0 टिप्पण्या