'एबीपी माझा' चे अज्ञान उघड ...

तुकोबाच्या नावावर चुकीचा अभंग प्रसारीत 


वारकरी संतप्त ! माझाने तात्काळ माफी मागावी.. 


परळी  वैजनाथ - एबीपी माझाचे अज्ञान  पुन्हा एकदा उघडे पडले आहे. संतश्रेष्ठ, जगतगुरु तुकाराम महाराज यांनी न लिहिलेला अभंग त्यांच्या नावे प्रसारित करून समस्थ  वारकऱ्यांच्या भावना एबीपी माझाने दुखावल्या आहेत. याप्रकरणी चॅनलने ऑन एयर माफी मागण्याची मागणी ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केली आहे. 


संतांच्या अभंग किंवा ओळी बातम्यांच्या संदर्भाला वापरताना निदान ते साहित्य अधिकृत आहे किंवा नाही हे तपासून न बघताच संतांची नावे वापरली जातात हे अत्यंत निषेधार्ह आहे. माझाने गुरुवारी सकाळी बातम्या देताना संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे म्हणून जीभजोड अभंग संदर्भ म्हणून वापरत त्यांनी संताचा अवमान केला आहे. 


कोणत्याही अभंग गाथा प्रतीत नसलेला ,"शब्द घासावा शब्द तासावा "असा लांबलचक अभंग एबीपी माझाने  दिनांक २६ आँगस्ट रोजी सकाळी संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून दाखवला व तो वाचून पण दाखविला. चुकीचे अभंग प्रसारित करुन नसलेले अभंग संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणून प्रसारण करणे आणि तेही बातमी देताना करणे निषेधार्ह आहे.


संत तुकाराम महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी एबीपी माझाने  ऑन एयर माफी मागावी, अशी मागणी संत वाड्मयाचे संशोधक तथा वारकरी साहित्य परिषदेचे मराठवाड़ा अध्यक्ष ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांनी केली आहे.Post a Comment

0 Comments