मराठी पत्रकारितेला मालकशाहीचे गुलाम बनवणारे खोजे

आरोपी क्रमांक एक : कुमार केतकर

भाग-११ वा

कुमार केतकर पुरोगामी विचारांचे आहेत का ? तर नाही.म्हणजे ते केवळ अर्धेसत्य आहे.मग ते प्रतिगामी आहेत का ? तर तसेही नाही.म्हणजे ते प्रतिगामी देखील नाहीत.मग समाजवादी,कम्युनिष्ट,शहरी नक्षलवादी इत्यादी वगैरे ? तर तसेही काही नाही.ते स्वतःला कट्टर काँग्रेसी,नेहरू-इंदिरावादी वगैरे ठरवण्याचा भरपूर आणि संधी मिळेल तिथे आटापिटा करतात.त्यासाठी ते कायम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर बंदूक ताणून असतात.याचा अर्थ ते संघ भाजपचे कट्टर विरोधी आहेत असा मात्र अर्थ होत नाही.ते जातीने ब्राम्हण आहेत.पण ब्राह्मण्य त्यांना मान्य नाही.असे ते म्हणतात.आता वरील पॅराग्राफ पुन्हा एकदा.पुन्हा पुन्हा वाचा.काही कळतंय का ? नाही ना.हीच केतकरांची खासियत आहे.किमानपक्षी,उलटपक्षी,साधारणतः,अनुषंगिक अर्थाने,किंबहुना त्यांना कोणत्याही विश्लेषणात नेमके काय म्हणायचे असते ते वाचकाला कधीच कळत नाही.त्यांचे कोणतेही भाषण पहिल्या पासून अखेरपर्यंत ऐका,किंवा त्यांचे लेखन प्रारंभापासून अखेरपर्यंत वाचा.घाट असतो घाट.वळणावळणाचा निरुंद घाट.बाजूला खोल दऱ्या.मुद्याचं ट्राफिक जाम.त्यात एखादी संदर्भाची दरड पडली की पुढची वाट बंद.जागीच रात्र किंवा पहाट.


   ते जाऊद्या.म्हणजे केतकर हे असे आहेत.म्हणजे त्यांना भूमिका म्हणून अशी काही नाही.असती तर ते लोकसत्तातून मटात मटातून लोकमतला अखेर अखेरीस दिव्य मराठीत कशाला गेले असते.म्हणजे त्यातून साधले काय ? पैसे मिळाले असतील पण साधले काय ? आताही केतकर राज्यसभेत आहेत.ज्या पक्षाच्या वतीने ते तिथे आहेत त्या पक्षाला तर त्यांचा काहीच फायदा नाही.कारण हा वैचारिक वळू नुसताच आहे.अधून मधून कधी तरी नेहरू,इंदिरा गांधी,राजीव गांधींच्या वैचारिक आरत्या गायच्या आणि संघ भाजपला धुवायचे म्हणजे यांचा पुरोगामित्वाचा कंडू शमतो.बाकी केतकर म्हणजे '

आत पोकळ बाहेर पोकळ

डोंबाऱ्याचा वेळू

म्हातारपणी नवरा केला

तो पोरं खेळू

बाई फु बाई फु

असाच प्रकार आहे.आजकाल ते सोनिया आणि राहुलचेही आन्हिके गातात.म्हणजे पहा.हा म्हसोबा असा शेंदराला पावतो.असो तर मागे एकदा कधीतरी त्यांनी,मला वाटते परभणीत,ब्राह्मणांच्याच संमेलनात,त्यांचेच वासे मोजले होते.त्यावेळी तेथील ब्रह्मवृन्दानी त्यांची चांगलीच कणिक तिंबली होती.असाच प्रसंग एकदा त्यांनी शिव वड्यावर अग्रलेख लिव्हला व्हता तव्हाबी आला व्हता.आणि जेम्स लेन- भांडारकर प्रकरणानंतर त्यांनी जी विचारसुमने उधळली होती त्यावर मेटे आणि मंडळींनी दिलेल्या व्हाईटवॉशची गंमत ते अजूनही विसरले नसतील.


    हेही असो.केतकर तसे विद्या व्यासंगी,वाचस्पती,साक्षेपी.मुमुक्षु इत्यादी इत्यादी आहेत.म्हणजे अनेकांचा तसा समज आहे.पण मी शपथेवर सांगतो.हा निव्वळ सोट आहे.सरळसोट.म्हणजे हे तिकडे राज्यसभेत आहेत.काय म्हणून आहेत.म्हणजे पत्रकार म्हणून की काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून.कारण दोन्ही बाबतीत त्यांनी आजवर तरी काही बोलल्याचे आमच्या तरी ऐकिवात नाही.केतकरांचे अनेक भक्त,चाहते पत्रकारितेत आणि बाहेरही आहेत.म्हणजे त्यांना मानणारे.पण ते त्यांना काय म्हणून मानतात हे त्यांना सांगता येणार नाही.केतकरांचे खरे पाप सांगू का ? मराठी पत्रकारितेला भांडवलदार मालकशाहीच्या दावणीला बांधून पत्रकार जमातीला वेठबिगार बनवणाऱ्या गुन्हेगारातील सर्वात अट्टल गुन्हेगार कोण असेल तर ते आहेत कुमार केतकर.आरोपी क्रमांक एक.मराठी वर्तमानपत्रात जातीय कंपुगिरी कोणी सुरु केली.चेले चपाटेगिरी कोणी सुरु केली.मालकांची चापुलाशी आणि हाताखालच्या सोबतच्या सहकाऱ्यांच्या शोषणाची परंपरा कोणी सुरु केली.संपादकीय विभागाला जाहिरात विभागाच्या दावणीला कोणी बांधले तर केतकरांनी.


वरकरणी केतकर मनमोकळे खिलाडू असल्याचे भासवतात,पण मनात आढी ठेवून असतात.संधी मिळाली की कलम.ते अजिबात उदार उमदे नितळ पारदर्शी वगैरे नाहीत.उलट खुनशी,पाताळयंत्री,षड्यंत्रकारी आणि पक्के पोलिटिकल आहेत.लोक बोलत नाहीत हो.म्हणजे केतकरांनी लोकसत्तेत,महाराष्ट्र टाइम्स मध्ये.लोकमत मध्ये असताना कोणाकोणाचे कसे कसे एन्काउंटर केले ते सांगत नाहीत लोक.दिव्य मराठीने त्यांचाच केला,हे ते सांगत नाहीत.बाकी चेले चपाटे आहेतच त्यांनी पेरून ठेवलेले,त्यांच्या दिव्यत्वाच्या आख्यानकथा सांगायला.एका शब्दात सांगतो.मराठी पत्रकारिता लाळघोटी करण्याचे पातक या माणूसघाण्या खेळखंडोबाने केले आहे.

(क्रमशः )

- रवींद्र तहकिक

7888030472


!--Composite Start-->

Post a Comment

2 Comments

  1. मेलात तर स्वर्गात जाल; आणि जगलात तर राज्य कराल हे कितीही खरं असलं तरी रिस्क घ्यायची हिंमत लागतेच लागते! ती दिसत्येय. शुभेच्छा!

    ReplyDelete