टाकाऊतून विकाऊ...
भाग १२ |
नाथपंथी,टिळकपंथी,नेमाडपंथी असे शब्द प्रयोग आपण अनेकदा ऐकले असतील.पण केतकर पंथी ? नसेल ऐकला. मराठी पत्रकारितेत केतकर पंथ आहे.केतकर पंथ म्हणजे कुमार केतकरांच्या चेल्या-चपाट्यांचा.भक्तांचा पंथ.त्यांच्या लेखन-व्याख्यानांच्या चाहत्या मंडळींबद्दल नाही बोलत आहे मी.ते बिचारे पेपरात वगैरे छापून येतं ते वाचतात.किंवा केतकर पोडियमसमोर उभे राहून मान खाजवत,हात चोळत बोलतात ते ऐकतात.त्यांना हा माणूस एलियनच भासतो.पण एलियन ही जशी फेक संकल्पना आहे ना,तसेच केतकरांचे जगङ्व्याळ ज्ञान आहे.त्यांचा लेख वाचल्यावर काय लक्षात राहते ? काहीच नाही.त्यांचे व्याख्यान ऐकल्यावर काय मिळते तर काहीच नाही.आला वारा गेला वारा.त्यांचे चेले ही तसेच.आला वारा गेला वारा.खरे सांगू काय केतकर म्हणजे टाकाऊतून विकाऊ (टिकावू नाही.)पत्रकार बनवण्याचा 'घाणा' आहे.(स्वतः केतकरच कुठे टिकत नाहीत तर चेले कसे कुठे टिकणार ?)घाण्याचा भोवती डोळ्याला झापडं लावून जागच्या जागी गोल गोल फिरत राहायचं.मालकाला तेल आणि आपल्याला पेंड मिळत राहते.पुन्हा (मेढीवर मान खाजवीत ) खूप चाललो बुवा ! म्हणायला मोकळे.तर असेच टाकाऊतून विकाऊ बनलेले केतकरांचे चेले आहेत संजय आवटे.ते हुबेहूब केतकर नव्हेत,पण तसा आव आणतात.किमानपक्षी तसा त्यांचा ओढून ताणून प्रयत्न असतो.पण तो प्रत्येकवेळी सपशेल फसतो.
मदारी जमुऱ्याला सगळ्या अटकळी शिकवीत नाही.त्यामुळे आवटे अर्धवट केतकर आहेत.तुम्ही आवट्यांचे लेख वाचा,त्यांची व्याखाने ऐका.गिरणी असते गिरणी.वरून त्यांनी वाचलेल्या पुस्तकातले उतारे पडतात आणि खाली शब्दांचे पीठ.गिऱ्हाईकाच्या मागणी नुसार ठोसर-बारीक.विषय कोणताही असो.त्यात त्यांचं काहीच नसतं.म्हणजे स्वतःचे मत,भूमिका,धारणा,तर्क,विचार काहीच नाही.हेही बरोबर आहे आणि तेही बरोबर आहे.किंवा हेही चूक आणि तेही चूक.उफण उफण उफणतो.पण उरत साचत काहीच नाही,वाऱ्यावरची वरात.फोलकट नुसतं.बरं ते लवकर उरकतही नाही.संपलं संपलं वाटतं,की पुन्हा ढराढरा ढराढरा.कोठा साफ होतंच नाही.वैचारिक मानसिक बद्धकोष्ठता.ती सतत त्यांच्या चेहऱ्यावर दिसते.तर केतकर पंथातले हे फेकनाथ.केतकरांनीच टाकाऊतून टिकावू केलेले.सध्या ते भोपळी दिव्य मराठीत त्यांच्या दिव्यत्वाची फेक प्रचिती देताहेत.तिथेही त्यांना अर्थात केतकरांनीच आणून बसवले.माणूस मूळचाच पायगुणी.बाराघरं बेल घालीत फिरलेला.हातगुणही आहेच.अनेक जवळच्यांना त्याचा अनुभवही आहे.
नाश्त्याला सकाळ.लंचला लोकमत,ब्रेकला कृषीवल,डिनरला साम टीव्ही,आणि आता दिव्य मराठीत अमर भूपाळी चालू आहे.काय तर म्हणे 'आता उरलो फक्त उपकारा पुरता'.! अरे वा रे वा उपकार... !! काय आहे,उत्तरकाळात जगाला कितीही भगवतगीता सांगितली तरी हेतू महाभारत घडवण्याचाच असतो.आणि हो एक राहिलंच की, कृष्णकथेतून ज्या प्रमाणे गोकुळात असताना यमुनाजळीं केलेल्या रासलीला वगळता येत नाहीत त्याच प्रमाणे सोलापूर संचार मध्ये असताना आवटेंनी केलेला 'गोपाळ काला' आणि 'रंग पंचमी' देखील विसरता येत नाही.
(क्रमशः)
-रवींद्र तहकिक
7888030472
!--Composite Start-->
0 टिप्पण्या