खरबुज्या खांडेकर ...

  भाग -८ 


आरं तिच्या मारी...या तोरसेकरांची बिनपाण्याची उलटी हजामत करावी म्हटली तर त्यांची पिचलेली गालफाडे सोलण्याची भीती.उगीच बलामत नको, म्हणून मालिश करून सोडून द्यावं म्हणून खमीस काढला तर आत बरगड्यांच्या सापळा.(खरा हाडाचा पत्रकार) मास-मसल्सचा पत्त्याच न्हाई.मालिश कशाची करायची ? लांबून वाघरू वाटलं.हे तर तरस निघालं.हिंदीत लक्कडबग्गा ! याच्या बगलातही 'झ्याट' नाही.भादरायचं काय ? नुसत्या पुड्या.पुड्यातही नुसती नखं.नाकातले केसही गांधी घराणे आणि पवार घराण्या विरोधात बिड्या फुंकून फुंकून जळालेले.ही केस सुधारण्या पलीकडे गेलेली आहे.जाऊद्या सोडा.मराठी पत्रकारितेला एक भाऊ तोरसेकर पुरेसा आहे.दुसरा कोणी तयार होऊ नये.ही अपेक्षा.आणि भाऊ तुम्हीही आता थांबा.जिथे फुले वेचली तिथे गोवऱ्या नका वेचू.दळभद्रीपणा सोडा.तुम्हाला नाही शोभत हो हे असं शिंगं मोडून वासरात शिरणं.म्हणजे आम्हाला पाहवत नाही तुमची ती एकांगी वरपांगी केविलवाणी आळवणी.थांबा.खरेच थांबा.नाहीतर पुढची पिढी पत्रकारितेत येणार नाही.तुमची ही अशी अवस्था पाहून.कधीकाळी पटावरच्या कुस्त्या मारलेल्या आणि चांदीच्या गदा जिंकलेल्या पैलवानाने जत्रेतल्या फडात उतरून मूठभर रेवडयासाठी चोराची लंगोटी बांधल्यावर कसे वाटेल.इतकी नका खुंटीवर टाकू.राखा.तुमची नाही तर निदान पत्रकारितेची तरी इभ्रत राखा.अधिक उणं मनाला लावून घेऊ नका.चुकलं माकलं,लेकरू मांडीवर हागलं म्हणून सोडून द्या.पण आमचा बाळबोध ऐकाच.पुरे आता ही थेरं...


    हे असं होतं बघा.म्हणजे हेडिंग काय,लेख चाललाय कुठे.पण एका झाडाची 'बाधा' उतरवल्या शिवाय दुसरं 'झाड' बोलतं करायचं कसं.असो,तर 'खरबुज्या खांडेकर' ! कोणी म्हणतील,काय लावलंय हे ? उगाच का एकेकाची  अंगडी टोपडी उतरवताय.दुसरा काही कामधंदा नाही का ? काहींना अशीही शंका वाटू शकते की आम्ही तूर्तास रिकामे बिकामे आहोत की काय,आणि रिकामपणाची रिकामचोट कामगिरी करतो आहोत की काय ? पण तसे काही नाही.आम्ही (अजूनतरी ) कामात आहोत.पण कोमात गेलेल्या,बधीरावस्थेत पोहचलेल्या,अधू-पंगू,बांडगुळा प्रमाणे परपोषी,परावलंबी झालेल्या पत्रकारितेला वेळीच उपचारांची गरज असल्याने वेळेत वेळ काढून मी ही सगळी खरडपट्टी करतोय.हे काम जिकरीचे तितकेच जोखमीचे आहे.यात लाभ काहीच नाही,झाले तर तोटेच होतील.


मी माझ्या उघड किंवा छुप्या हीतशत्रूंची संख्या वाढवतोय.या निमित्ताने.लोकांना कौतुक स्तुती आवडते.टीका कोण ऐकून घेणार ? खासकरून आपण काही चुकीचे करतोय हे ज्यांना मान्यच नसते ते तर मला भांडायला उठतील.तू कोण आम्हाला शहाणपणा शिकवणारा ? तू कोणता सद्गुणांचा पुतळा लागून गेला ? तुझ्या बुडाखालचा अंधार बघ आधी.आपलं झाकून आमचं काय वाकून पाहतोस ? आमचं कुसळ सांगतोस पण तुझं मुसळ बघ, असेही म्हणतील.आपसात कुजबुज करतील.माझी बदनामी करतील.तक्रारी करतील.अफवा गैरसमज पसरवतील.माझा आवाज दाबण्या साठी जे जे म्हणून करता येईल ते ते करतील.पण करुद्यात.मी आघात सोसायला तयार आहे.पण लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाला लागलेली कीड-वाळवी मी  साफ करणारच.समजा नाही झाली साफ,तरी मी ती उघड्यावर आणणार.उन्हात मांडणार.वेळ लागेल.लागूद्या.पण कोणीतरी हे करायलाच हवं.पैसा कमावताना माध्यमांनी जनतेचा विश्वास गमावता कामा नये.


प्रॉब्लेम नेमका हाच आहे,सिस्टिमला दोष देऊन आणि परिस्थितीवर खापर फोडून आपणाला मोकळे होता येणार नाही.आपण सामान्य नाहीत.पत्रकार आहोत.सिस्टीम आणि परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्यात हवे.पण हे घडताना दिसत नाही.इथेच तर घोडे पेंड खातेय.माझा कोणावरही राग लोभ नाही.मी ज्यांच्या बद्दल लिहितोय किंवा लिहीन त्यांना मी ओळखतही नाही.तेही मला ओळखत नाहीत.त्यांनी कधीही माझे काही घोडे मारलेले नाही.पण तरी मी हे का लिहितोय ? मला खळांची व्यंकटी काढायची आहे.म्हणजे वाइटांचे वाकडेपण सरळ करायचे आहे. माझा प्रामाणिक हेतू सर्वाना नीट समजायला हवा,हे कोणाच्याही वैयक्तिक द्वेष दिग्दर्शनाचे किंवा अवहेलनेचे अभियान नाही.हे कृपया लक्षात घ्या..असो तर,खरबुज्या खांडेकर...

(क्रमशः)

खरबुज्या खांडेकरांची  बिन पाण्याची हजामत पुढील भागात नक्की वाचा ... 

-रवींद्र तहकिक

7888030472


!--Composite Start-->

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या