खरबुज्या माझा ...


  भाग-९ 

महाराष्ट्रात कोणालाही माहीत नसलेला एक दंभस्फोट सुरुवातीलाच करून टाकतो.म्हणजे मग राजीव खांडेकरांना मी 'खरबुज्या माझा' का म्हणतोय त्याचा तुम्हाला नीट खुलासा उलगडा होईल.आठवा ; फडणवीसांच्या 'पुन्हा' मुख्यमंत्री होण्याला 'पनौती' ठरलेली आणि शिवसेना-भाजपा युती फुटून तीन पक्षांची महा-विकास आघाडी बनायला 'कारणीभूत' ठरलेली.फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना विधानसभेत वाचलेली (आणि नंतर महाराष्ट्रात सर्वार्थाने वाजलेली) 'मी पुन्हा येईन' ही कविता ! या कवितेचे 'महाकवी' आहेत महामहोपाध्याय श्री श्री श्री ४२०.राजीव खांडेकर ! बसला ना धक्का !! पण हे शत प्रतिक्षत खरे आहे.कळले ना आता मी खांडेकरांना 'खरबुज्या माझा' का म्हणालो ते.


राजीव खांडेकर असे नव्हते.म्हणजे ते १९८८-८९ ला पुणे सकाळ मध्ये लागले तेव्हा.नंतर सकाळच्याच नाशिक आवृत्तीत बढतीवर.मग लोकसत्तात,अगदी ई-टीव्हीत असताना सुद्धा असे नव्हते.म्हणजे मी त्यांच्या अक्कडबाज मिशा किंवा सध्या कायम फुगलेल्या ५६ इंची चेस्ट बद्दल नाही बोलत आहे.त्यांच्या पत्रकारिते बद्दल बोलतोय.चांगला होता म्हणतात पूर्वी हा गडी.म्हणजे मान मोडून काम करणारा.ऑफिस गॉसिप मध्ये सहभागी न होणारा,अगदीच लाजाळू नाही पण बराचसा संकोची.मर्यादशील.अभ्यासू आणि शिकण्याची स्वतःला अपडेट करण्याची जिद्द असणारा.धडपड्या वगैरे.संपर्कशील,संवादी.टिमवर्कला प्राधान्य देणारा.सहकार्यवादी.म्हणून तर भरभर पुढे गेला.वाढला.


एवढ्या स्पर्धेत (अन कापाकापीत) एबीपी सारख्या एखाद्या व्यावसायिक वृत्तवाहिनीत इतकी वर्ष 'की ' पोस्टवर टिकून (की चिकटून?) राहणं ही देखील कमालच नाही का ? म्हणजे पहा ना,वागळे,निरगुडकर,आंबेकर, जाधव, तुळशीदास भोईटे यांचं काय झालं ? पण खांडेकर (कशाच्या बळावर माहीत नाही ) टिकून आहेत,त्यातही  केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीसांचं सरकार काय आलं (ही सरकारे भाजपची नव्हतीच,म्हणजे नाहीत आणि पुढेही आली तर ती भाजपची नसतील.ही सरकारे असतील तर मोदी-शहा-फडणवीसांचीच असतील,अन्यथा नसतील)असो तर त्यामुळे  या 'गुणा'चा चक्क 'अवगुणा' झाला.म्हणजे त्याला चांगल्या मिशा फुटल्या.त्याही अक्कडबाज.(अक्कडही वाढली)  माणूस सांगलीकडचा  पार आटपाडीचा असला म्हणून काय झालं.अशा कोण्ही बी मिशा वाढून चालतं का ? बरे ही मिशीची मिराशीही कोणाच्या मिरासदारीवर ? हे काय उघडच सांगायला हवं ? 


एबीपी माझाला बीजेपी माझा बोलतात लोक.तास तास मुलाखती ? तेही किचन मध्ये ! वाहिनी आज नाश्त्याला काय ? साहेबांचे कपडे तुम्ही खरेदी करता की तेच,डिश कोणती आवडते.मग गाणी,त्या नंतर गोष्टी.घरच्या गणपतीची लाईव्ह आरती.याला तुम्ही पत्रकारिता म्हणता खांडेकर ? मला तर ना बुवा...म्हणजे राग नका येऊन देऊ.पण राजीव खांडेकरांना अक्कड बाज मिशात पाहिलं ना की 'नटरंग' सिनेमातल्या अतुल कुलकर्णीने (लोकमतवाला नव्हे सिनेमातला) साकारलेल्या 'गुणा'चीच आठवण होते,नव्हे भासच होतो म्हणानात.हुबेहूब 'गुणा'च ! सिनेमात नंतर त्या 'गुणा'चा,'सगुणा' होतो हा भाग वेगळा.म्हणजे तसं काही या 'अवगुणात' होऊ नये म्हणजे मिळवली.


मी आधीच सांगितलंय.राजीव खांडेकरांशी माझी दूर दूर पर्यंत ओळख पाळख नाही.कधी भेटगाठ नाही.अगदी फोनवर सुद्धा बोलणं किंवा सोशल मीडियावर कधी 'चाट' नाही.पण माणूस समजायला ओळखायला तो जवळच असला पाहिजे असे काही नाही.उदाहरणा सह सांगतो.खांडेकर त्यांच्या वाहिनीत तसे सगळ्यांच्या जवळ आहेत की नाही ? पण कोणाला खरे कळलेत ? त्यांचे फडणवीसांशी असलेले सख्य सोडा,पण कोरोना काळात त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची किती पिळवणूक केली ? ठीक आहे इतक्या धोकादायक स्थितीत चॅनल चालवायला टीआरपीच्या रँक मध्ये राहायला कॉम्प्रमाइज करायला लागतं,पण किती ?


 अरे चौथ्या स्तंभाची म्हणून काही इभ्रत इज्जत ठेवाल की नाही ? किती आरत्या ओवाळणार अमुकच एकाच्या.पॅकेजसाठी.किती ओढून ताणून नाकदुऱ्या काढणार.खुशमस्कऱ्या करणार.किती पाठलाग करणार राजकीय नेत्यांचा.बसले,उठले,जेवले,झोपले,चालले.त्यांचा पाठलाग.विषय काय ? तर काहीच नाही.काहीच विषय नाही त्याची बातमी.दिवसभर ? लाईव्ह टेलिकास्ट.ग्राउंड रिपोर्ट.खरेच,अक्षरशः  कपभर चहावर,एका वडापाव वर,वार्ताहरांना उन्हातान्हात,कोरोनाच्या खाईत फिरवलेत तुम्ही.सुरक्षा काय ? तर राम भरोसे.करायचे तर करा नाहीतर फुटा.स्वतःची खुर्ची,सुरक्षा महत्वाची आणि बाकी सगळे वाऱ्यावर.बाकी संपादक म्हणून आपण बातम्यांशी आणि तत्वाशी किती प्रामाणिक रहाता,हे तुम्हीच तपासा.किंवा सगळ्यांना कळतं हो आजकाल आता सगळं.मांजराने डोळे मिटले म्हणजे जग डोळे मिटत नाही.

(क्रमशः )  

-रवींद्र तहकिक

7888030472!--Composite Start-->

Post a Comment

1 Comments

  1. लय मरणाच हसलो राव, बरच पटल... लिखाण बाकी ठेवेणीतल...

    ReplyDelete