( भाग -१५ वा ) |
आठ पंधरा दिवस मध्यंतर घेतले.अनेकांना वाटले बरे झाले लेखमाला बंद झाली.अनेकांचे जीव भांड्यात पडले.अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या.तुम्हाला सांगतो ही लेखमाला बंद व्हावी म्हणून अनेकांनी काय काय प्रयत्न नाही केले म्हणून विचारा.बेरक्याला सौजन्य आणि सबुरीचे अनाहूत सल्ले देण्याचा प्रयत्न झाला.कशाला उगाच आपल्याच लोकांचे कपडे फाडताय म्हणून.मलाही फोन करून यात आपल्याच क्षेत्राची बदनामी होतेय म्हणून समुपदेशन करण्याचा 'बौद्धिक' घेण्याचा प्रयत्न झाला.काहीजण आमच्या वरपर्यंत गेले.तुमच्या माणसाला थांबवा म्हणून सांगायला.योगायोगाने त्याच सुमारास लेखमालेत मी मध्यंतर घेतले.अनेकांना वाटले 'काम हो गया' पण नाही.असे काहीही झालेले नाही.लेखमाला सुरु राहील.कार्यबाहुल्यामुळे रोज सलग नाही पण आठवड्यातून किमान दोन,निदान एक तरी लेख लिहिण्याचा मानस आहे.आणि होय लिहिण्याची धार सचोटी निर्भीडता तुसुभरही कमी होणार नाही.
पुन्हा सांगतो.या लेखमालेचा उद्देश पत्रकारितेतील कोणाही दैनिक किंवा वृत्त वाहिनीला किंवा त्यात काम करणाऱ्या कोण्या व्यक्तीला बदनाम करण्याचा आजिबात नाही.आमचा कोणावरही राग लोभ द्वेष असूया नाही.मात्र मराठी पत्रकारितेत असलेल्या दोषांवर आणि त्यासाठीच्या कारणी'भुतां'ना आम्ही झोडपून काढणार.त्यात हातचा राखणार नाही.होऊन होऊन काय होईल ? बाडगे नाराज होतील.सूड घेण्याचा प्रयत्न करतील.डूख धरतील.चिंता नाही.पेपरवाले मला दारात उभे करणार नाहीत.हरकत नाही.इथे कोणाला गरज आहे ? नाराज मंडळीशी रिलेशन बिघडतील ? त्याचीही तयारी आहे.तशीही त्या कोणाच्या ओंजळीने पाणी पिण्याची मला व्यक्तिशः काही आवश्यकता नाही.बाकी जास्तीत जास्त काय होईल ? हनी ट्रॅप,मनी ट्रॅप,किंवा मर्डर ! आहि म्हणजे खुनाच्या सुपाऱ्या देई पर्यंत मजल पोहोचलीच आहे ना पत्रकारांची.पण या गोष्टींना मी भीत नाही.त्यामागे नैतिक कारणे आहेत.समजा या लढाईत हातची नोकरी गमावली तरी आपल्याला कोणाकडे हात पसरण्याची गरज नाही.नाही तरी आता पत्रकारितेचीही हौस फिटली आहे.असो तर हे सगळं यासाठी सांगितलं की कोणीही कोणत्याही प्रकारचा दबाव आणून माझा आवाज थांबवण्याचा प्रयत्न करून काहीही फायदा होणार नाही.
असो,तर आजचा विषय वेगळाच होता.परंतु विधानसभेत नाही का ऐनवेळेचा विषय घेतला जातो तसे दोन ऐन वेळचे विषय आहेत आज.पहिला विषय लोकमतच्या 'चिवडेगिरी'चा आणि दुसरा एबीपी माझाच्या 'चुकांच्या कळसाचा' ! एक मराठी पत्रकार म्हणून एबीपी माझाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे,त्या राजीव खांडेकरला हाकला हो एकदाचा.दूध देतोय का तो तिकडे ? संघाची शाखा आणि भाजपचा मीडिया सेल असल्यागत चॅनल चालवतोय.आणि ती अज्ञानदा ! परवा नारायण राणेंच्या अटक नाट्याच्या निमित्ताने एबीपी माझाने संत तुकारामांचा म्हणून एक भलताच अभंग दाखवला.अभंगाची रचना,भाषा,त्यातील विचार,वकूब पाहता हा अभंग राजीव खांडेकरानेच लिहिला असला पाहिजे.फडणवीसांना लिहून दिलेल्या खांडेकरकृत 'मी पुन्हा येईन' या कवितेची भाषा आणि या अभंगाची भाषा बरीच सारखी आहे.हरकत नाही.कविता म्हणून किंवा अभंग म्हणून का होईना खांडेकरने जे बकवास खरडले ते दाखवायला,वाचायला हरकत नव्हती पण ही रचना चक्क तुकारामाची म्हणून सांगणे म्हणजे 'चुकांचा कळस' झाला.(खरे तर निर्ल्लज्ज पणाचा) ही हरामखोरी आहे.वारकरी संप्रदायाकडून त्याचा निषेध होतोय पण त्यात पाहिजे तेवढा जोर नाही,याचे कारण वारकरी संप्रदाय आणि त्यातले बहुतेक महाराज मंडळी देखील 'चुकांचे कळस' बनलेत हल्ली.त्यामुळेच तर हे असले बौद्धिक पाजळण्याची खांडेकरांची हिम्मत होते.पुरंदरेंच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील जनतेने खोट्या इतिहासाच्या आरत्या खपवून घेतल्या त्याचा हा परिणाम आहे .आता खांडेकरांच्या या अभंगरचनेचा मृदंग खपवून घेतला तर खांडेकर उद्या संतांचे साहित्य संघ भाजपच्या सोयीचे करायला किंवा नव्याने बनवून संतांच्या नावाने खपवायला कमी करणार नाहीत.
...आणि लोकमतचा चिवडा !
ही काही पहिली वेळ नाही लोकमतची,यापूर्वी पेपरला डकवून शाम्पूच्या पुड्या,थ्रीडी गॉगल,तेलाचे पाऊच,फेअर अँड लव्हली,पॉंड्स पावडर पाऊच (एकदा तर चक्क कंडोम) वाचकांना पाठवण्याची किमया या व्हाईस ऑफ महाराष्ट्राने केली आहे.वाघ्याचा पाग्या झाला तरी त्याचा यळकोट जात नाही म्हणतात तो असा.राजकारणातल्या राणे फॅमिली प्रमाणेच पत्रकारितेत दर्डा फॅमिली आहे.राणेंनी बाळासाहेबांना धोका दिला यांनी वसंतराव नाईकांना.पण राणे जसे मूळचे कोंबडीचोर तसे हे हलवाई.यांचे खापरपणजोबा म्हणे गावोगावचे बाजार,यात्रा,जत्रा फिरून शेव,चिवडा,मुरमुरे-फुटाणे,लाह्या-बत्तासे,रेवड्या-गोडीशेव,भेळ-जिलेबी विकायचे म्हणतात.(जाऊद्या कशाला काढायचे ते जुने काळे कोळसे ) पण काही गुणसूत्रे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात.तसे खापरपंजोबाचे गुण खापर परतोंडी उतरलेत.कारण आता लोकमत सोबत वाचकांना 'चकणा' सुद्धा मिळणार आहे.शेव,चिवडा,फरसाण,पीनट,डाळ असे बरेच काही.ही तर सुरुवात आहे.म्हणजे ट्रेलर.पिच्चर अभी बाकी आहे.पेपर सोबत 'चकणा' ही अभिनव कल्पना यशस्वी झाली की मग 'बाटली' ही देता येईल.पेपर अंथरण्याच्या कामाला येईल.नाहीतरी त्यात वाचायला असते तरी काय ?
(क्रमशः )
-रवींद्र तहकिक
7888030472
0 टिप्पण्या