न्यूज १८ लोकमतमध्ये प्रीती सोमपुरा वरिष्ठ संपादक

'उजडा चमन' गट अस्वस्थ, अनेक विकेट पडणार ! 
मुंबई - न्यूज १८ लोकमतमध्ये प्रीती सोमपुरा वरिष्ठ संपादक म्हणून सूत्रे हाती घेतल्याने 'उजडा चमन'  गट अस्वस्थ झाला आहे. सोमपुरा यांच्या एंट्रीनंतर लवकरच अनेक विकेट पडण्याची शक्यता आहे. 


उद्योगपती मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या नेटवर्क १८ चे न्यूज १८ लोकमत हे मराठी चॅनल सर्व काही असूनही सर्वात मागे आहे.  वितरण नंबर १ , स्टुडिओ नंबर १ , ग्राफिक्स नंबर १, कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर ! तरीही हे चॅनल मागे आहे. चॅनलने विविध प्रयोग केले,माणसे बदलली, संपादक बदलले पण परिस्थिती जैसे थे !


निखिल वागळे  गेल्यापासून या चॅनलमध्ये दम राहिलेला नाही. वागळे नंतर  मंदार आले पण 'फणस' काही दरवळला नाही, त्यानंतर 'राव' आले पण 'गाव' काही गवसला नाही. त्यानंतर प्रसाद आले पण 'काथ्याकूट'च करीत बसले.  त्यानंतर  निरगुडकर आले पण चॅनलचा "उदय" काही झाला नाही. त्यानंतर  कुमावत आले पण चॅनल अधिक कमकुवत झाले. त्यानतंर म्हात्रे - पाटील आले आणि  पाटीलकी  करीत बसले. त्यामुळे चॅनल काही सुधारले नाही आणि न्यूज १८ नेटवर्क हे लोकमत काही झाले नाही. आता सोमपुरा आल्यानंतर तरी चॅनलची लोकांना "प्रीती" लागणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


चॅनलमध्ये प्रीती सोमपुरा यांची एंट्री झाल्यामुळे "उजडा चमन" गट अस्वस्थ झाला आहे. काम न करता केवळ चमकोगिरी करणाऱ्या कामचुकार लोकांवर सध्या टांगती तलवार आहे. 

जाता जाता : न्यूज १८ लोकमत मधून बाहेर पडल्यानंतर चार वर्षे काळं कुत्रं देखील न विचारलेला पुन्हा स्वगृही येण्यासाठी प्रयत्नशील होता, पण प्रीती सोमपुरामुळे त्याचा  पत्ता कट झाला आहे.  सध्या असलेल्या चॅनलमध्ये फार मोठी संधी असताना केवळ 'फेव्हरिझम' केल्यामुळे धोबी का कुत्ता, धोबी का कुत्ता न घर का न घाटका,  अशी अवस्था झाली आहे. 


Post a Comment

0 Comments