मुंबई - बेरक्याचे भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे. ठोकशाही चॅनलच्या एच.आर. च्या जाचक नियमाला आणि जाचाला कंटाळून ऑगस्ट महिन्यात आठ जणांनी राजीनामे देऊन अन्य ठिकाणी नोकरी शोधली आहे.
ऑगस्ट महिन्यात शुभम कुलकर्णी ,अपूर्वा कुलकर्णी, ओमकार वाभळे,प्राजक्ता तांडेल,रुबिना पठाण,सिद्धी सोनटक्के आदींनी राजीनामा देऊन अन्य ठिकाणी नोकरी शोधली आहे.
ठोकाशाही चॅनलच्या एच. आर. च्या जाचक नियमाला आणि जाचाला कंटाळून अनेकजण एक महिन्यातच राजीनामा देत आहेत. यामुळे चॅनलची बदनामी होत असताना मालक कसे काय शांत आहेत ? हे एक कोडेच आहे.
बातमीचा कसलाही दर्जा नाही. काही बोटावर मोजण्याएवढे लोक सोडले तर नव्या पोरांना घेऊन चॅनल चालविले जात आहे. चला नोकरी तरी मिळाली म्हणून नवखे जॉईन होत असले तरी एचआर च्या कडक नियमामुळे ते जास्त दिवस टिकतच नाहीत.
९ ते १० तास राबवून आठवड्यातून एकच सुट्टी देणे,कामानिमित्त सुट्टी हवी असल्यास सुट्टी न देणे, मार्केटिंगच्या व्यक्तीची इनपुट - आउटपुट मध्ये चाललेली ढवळाढवळ तसेच . 'तेरी कॅम्पलेंट आई है ...मिलने आना' असं म्हणत कॉन्फरन्स रूम मध्ये ओरडणं ...चूक नसताना असभ्य भाषेत बोलणं , सतत ऑफिसमधून काढून टाकण्याची धमक्या देणं यामुळे कर्मचारी वैतागले आहेत.
जाचाला कंटाळून कुणी नोकरीचा राजीनामा दिला तर तीन महिने नोटीस पिरियड आहे, ते पूर्ण करूनच बाहेर पडायचे तसेच अँकर असेल तर बाहेर सहा महिने अँकरिंग करायची नाही असे धमक्या देणे, कुणी सोडूनच गेला तर कॉल करून माझी लीगल टीम ऍक्शन घेईल म्हणून धमक्या देणे सुरु आहे.
नोटीस पिरियड फार तर १५ दिवसाचा आहे, असे कोर्टाने निकाल दिला असताना, लीगल ऍक्शन घेईन म्हणून धमक्या देणे हे कायद्याच्या कोणत्या चौकटीमध्ये बसते ? असा प्रश्न विचारला जात आहे.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष
ठोकशाही चॅनलने कोरोना काळात कर्मचाऱ्यांचा अक्षरशः छळ केला. कोणतेही सोशल डिस्टिंसिंग पाळण्यात आले नाही. तसेच एका किरकोळ हॉटेलात ठेवून निकृष्ट जेवण देण्यात आले. तसेच कर्मचारी बाहेरून येत होते, त्यांना पिकअप आणि ड्राप साठी वाहनांची व्यवस्था केली नाही.
चॅनलमधील वॉशरूम अत्यंत घाण आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नाक मुठीत धरून जावे लागते.यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना युरीन इन्फेक्शन झाल्याने हॉस्पिटलमध्ये पैसे घालावे लागले. तसेच कॅटिंग देखील अस्वच्छ असल्याने कर्मचाऱ्यांना नाश्ता आणि जेवण करण्यासाठी घाणीत बसूनच पोट भरावे लागत आहे.
0 टिप्पण्या