पुण्यात 'या' नव्या दैनिकासाठी हवे आहेत...पुणे - पुणे येथून लवकरच राष्ट्रसंचार नावाचे नवे दैनिक प्रसिद्ध होणार आहे. यासाठी उपसंपादक, आर्टिस्ट, ऑपरेटर, वृत्त आणि जाहिरात प्रतिनिधी आदी जागा भरण्यात येणार असून, त्याची जाहिरात आज दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झाली आहे. 


एकीकडे कोरोनामुळे अनेक वृत्तपत्रे बंद पडण्याच्या मार्गावर असताना, राष्ट्रसंचार नावाचे १६ पानी  रंगीत दैनिक वाचकांच्या भेटीला येत आहे.पुणे आणि पिंपरी - चिंचवड महापालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच  राष्ट्रसंचार सुरु होत आहे. 

हे दैनिक आता किती दिवस चालणार की आपला जम बसवून प्रस्थापित दैनिकांना टक्कर देणार ? याकडे लक्ष वेधले आहे.


दैनिक सकाळमधील राष्ट्रसंचारची जाहिरात पाहा टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या