मानबिंदूत लांबे येताच , नजीर शेख यांचा राजीनामा

 




औरंगाबाद - मानबिंदूच्या औरंगाबाद मुख्यालयात आज एक विकेट पडली आहे. धनंजय लांबे यांनी ब्युरो चीफची सूत्रे स्वीकारताच, यापूर्वीचे ब्युरो चीफ नजीर शेख यांनी राजीनामा दिला आहे. 


नजीर शेख यांचे कामाकडे लक्ष नाही, असा ठपका ठेवून काही दिवसापूर्वी मानबिंदूने आपल्या पेपरमध्ये औरंगाबाद शहरासाठी ब्युरो चीफ पाहिजे म्हणून जाहिरात दिली होती. पण म्हणावा तसा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून बाबूजींच्या संपर्कात आलेले एकमेव इच्छुक  धनंजय लांबे यांची निवड करण्यात आली. 


पुढारीतून नारळ मिळाल्यानंतर धनंजय लांबे रिकामे होते, त्यामुळे थेट फौजदारवरून कॉन्स्टेबल झाले. दिव्य मराठी आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये निवासी संपादक आणि पुढारीत कार्यकारी संपादक असलेले लांबे चक्क लोकमतमध्ये  ब्युरो चीफ पदावर जॉईन झाल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


दरम्यान, नजीर शेख यांनी ब्युरो चीफ पदावरून पुन्हा रिपोर्टरपदी गच्छन्ति होताच, त्यांनी राजीनामा देऊन घरी जाणे पसंद केले. नजीर शेख आता एका राजकीय नेत्यावर  पुस्तक लिहिण्याचे काम हाती घेतल्याचे समजते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या