'ठोकशाही'चा हुकूमशहा किम जोंग उन ताळ्यावर

 'बेरक्या'च्या बातमीचा दणका

मुंबई - ठोकशाहीचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी बेरक्याच्या बातमीचा चांगलाच धसका घेतलेला दिसतोय. ठोकशाही बद्दल दोन लेख काय बेरक्याने लिहिले, लगेच बैठकांचं सत्र सुरू झालं, आणि दोन दिवसांच्या आत हुकूमशहा किम जोंग उन याने सगळ्यांची शाळा घेतली. एकूणच त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचं दिसतेय. आम्हाला बेरक्याच्या लेखांचा काहीच फरक पडत नाही, असा एकीकडे टेंभा मिरवत असताना दुसरीकडे मात्र त्यासाठी न्यूजरूममध्ये मिटिंग घेतली जाते, आणि सगळ्यांना ताकीद दिली जाते, ह्यावरूनच बेरक्याच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसून येतो. 


ठोकशाहीच्या हुकूमशहाच्या मनात एक वेगळीच शंका आहे की आपली प्रगती पाहता बाहेरचे चॅनल्स आपली टीम फोडण्याचा प्रयत्न करतायत, आणि म्हणूनच आपल्या चॅनल मधील लोकांना बाहेर बोलावलं जातं. पण लोक सोडून जातायत ते तुमच्या ढिसाळ मॅनेजमेंट ला कंटाळून हे त्यांना कोणीतरी समजावून द्यायला हवं. ह्यावर कंपनीमधल्या माणसांना गाजर म्हणून 'भविष्यात आम्ही तुम्हाला गाड्या घेऊन देऊ, पण आमच्यासोबत राहा' अशी विनंतीवजा धमकीयुक्त आर्जव केलं जातंय. वर आपण लवकरच हिंदी आणि गुजराती चॅनल लाँच करणार आहोत असंसुद्धा गाजर दाखवलं जातं. पण जे चॅनल कार्यकारी संपादकांना साधा त्यांचा दर्जा देऊ शकत नाही ते कर्मचारी वर्गाला काय चांगली वागणूक देणार हा सवाल उपस्थित होतो. 


चॅनलमध्ये सध्या दुफळी माजली आहे. इनपुट आणि आउटपुटमधून विस्तव जात नाही. विशेषतः मॉर्निंग आउटपुटमधल्या काही जणांकडून नेहमी इनपुटवर डाफरलं जातं. त्यांच्यातली 'नळावरची भांडणं'ही तर रोजची ठरलेली. ज्यांना बाकीच्या चॅनलमधून अक्षरशः हाकलून दिलंय त्यांना इथे संधी मिळाल्याने ते रुबाब झाडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यात आउटपुट मध्ये रनवर अकार्यक्षम लोकांना बसवून ठेवल्याने स्क्रीनवरच्या चुका नित्याच्या झाल्या आहेत. असा एक दिवस आजवर उजाडला नाही ज्यात स्क्रीनवर शुध्दलेखनाची चूक झालेली नाही. इनपुटची दशा तर काय वर्णावी ? जेव्हापासून काही वार्ताहरानी 'निवृत्ती' घेतली तेव्हापासून चॅनलची दशा चव्हाट्यावर आलेली आहे. हुकूमशहाचा 'राज' दरबारी पोहोचण्याचा अट्टाहास त्यांचा घात करून गेला. 


मुंबईबाहेर युनिट्स तर सोडाच, साधा बुम सुद्धा दिला जात नाही. काही स्ट्रिंजर्सकडे साधा आयडीसुद्धा नाही, इतकी वाईट अवस्था त्यांची झाली आहे. स्ट्रिंजर्सचे पगार वेळेवर होत नाही, पैसे कापून दिले जातात, ह्याची चर्चा तर वार्ताहरांच्या वर्तुळात अगदी चवीने होते. वार्ताहराना आई बहिणीवरून शिव्या जेव्हा थेट हुकूमशहाकडून घातल्या जातात तेव्हाच चॅनलचं भवितव्य काय आहे, हे लक्षात येतं.


 ह्या दुर्दशेने चॅनलकडे नवी माणसं येत नाहीयेत, नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेल्या मुलांना ऍडमिशन देऊन आपणच कसे 'यंगेस्ट चॅनल' आहोत हे दाखवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. मात्र बाहेरून आलबेल वाटणारं चॅनल आतून पोखरलं गेलंय. ठोकशाही सोडून गेलेला एकही जण आनंदाने गेलेला नाही, माजी कार्यकारी संपादकांपासून ते डेस्कवर काम करणाऱ्यापर्यंत सगळेच जण कंटाळून आणि मॅनेजमेंटशी भांडून गेलेयत. कारण संपादकांच्या जवळ असणारी चांडाळ चौकडी जे त्यांच्यापर्यंत पोहोचवते, तेवढंच हुकूमशहाना दिसतं.  एक दिवस हीच चांडाळ चौकडी मालकासकट चॅनलला घेऊन बुडेल अशी आकाशवाणी झाल्याचं ऐकिवात आहे. बाकी.. उलटी गिनती शुरु हो गयी है !!!

Post a Comment

2 Comments

  1. कृपया आपल्या वेबसाईट वर यूझरने सिलेक्ट केलेली भाषा (मराठी/इंग्रजी) दरेक अर्ध्या-पाव मिनिटात आपोआप बदलू देऊ नका. त्याने भयंकर त्रास अन् दगदग‌ होते.
    भाषेचा आॅप्शन वेबपेजवरच पहिल्यांदा द्या.

    ReplyDelete
  2. Sands Casino & Resort, Nevada | Online Slots - SecCasino
    Casino Sands is the premier entertainment destination 제왕 카지노 in Las Vegas, Nevada with an upscale 인카지노 casino vibe, septcasino a state-of-the-art spa,

    ReplyDelete