लोकशाही चॅनलवर १ हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

खोट्या बातम्या प्रसारित करून मुंबै बँकेची बदनामी

 


मुंबई,  –खोट्या बातम्या प्रसारित करणाऱ्या लोकशाही चॅनल आणि लोकसत्ता दैनिकावर  मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने  न्यायालयात १ हजार कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे लोकशाही चॅनल मालकाचे धाबे दणाणले आहेत. 


 मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बॅंक आहे. कारण मुंबै बॅंक बाराशे कोटीच्या टप्प्यावरून दहा हजार कोटीवर आली आहे. मुंबै बँकेच्या लौकिकास काळीमा फासण्याचे काम दुदैर्वाने काही जणांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबै बॅंकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते विधाने करतील व बदनामीकारक बातम्या प्रसिध्द करतील हे अयोग्य असल्यामुळे बँकेने कालच मुंबई उच्च न्यायालयात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक व इतर समूह, वृत्तपत्र दैनिक लोकसत्ता आणि वृत्त वाहिनी लोकशाही या तिघांविरुध्द प्रत्येकी रु.१ हजार कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याची माहिती मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सरव्यवस्थापक श्री. देवदास कदम यांनी आज दिली. 


प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना देवदास कदम यांनी सांगितले की, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला इथपर्यंत आणण्यात अनेक सभासद, ठेवीदार, आजी- माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, कर्मचारी आदींचे योगदान आहे. मुंबै बॅंक ही मुंबईच्या सहकाराचे वैभव आहे. पण बॅंकेला काळिमा फासण्याचे काम सर्व टप्प्यावर होत आहे. 


एका आर्थिक संस्थेची बदनामी झाल्याचा परिणाम त्यांचे ग्राहक, डिपॉझिटर्स यांच्यावर होतो. या बँकेवर लाखो लोकांचे पोट अवलंबून आहे. एखाद्या बातमीने किंवा एखाद्या स्टेटमेंटने बँक अडचणीत आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणून आम्ही मुंबै बँकेच्या बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात सूट नंबर (एल) २१९०९ ऑफ २०२१ - (द इंडियन एक्सप्रेस (प्रा.) लिमिटेड अँण्ड अदर्स) आणि सूट नंबर (एल) २१९३५ ऑफ २०२१ - (नवाब मलिक अँण्ड अदर्स) या नोंदणी क्रमांकप्रमाणे अब्रुनुकसानीचा  दावा दाखल केला आहे. वृत्त वाहिनी लोकशाहीच्या विरोधात उच्च न्यायालयात आजच अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. मुंबै बॅंकेची नाहक बदनामी करणा-यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आम्ही न्यायालयात केल्याची माहिती देवदास कदम यांनी यावेळी दिली. तसेच अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर आता बॅंकेच्या वतीने फौजदारी दावा दाखल करीत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.


बदनामी करण्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव समंत

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेमध्ये मुंबै बँकेच्या होणा-या बदनामी संदर्भात सभासदांनी चिंता व्यक्त केली. मुंबै जिल्हा बॅंकेची बदनामी करणा-या संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखाने समंत करण्यात आल्याची माहिती बॅंकेचे सरव्यवस्थापक कदम यांनी दिली.

Post a Comment

0 Comments