दैनिक ''लोकमत'ने पसरवलेली अंधश्रध्दा ...

 


जळगाव - जळगाव लोकमतचे संपादक रवी टाले आहेत. दैनिकात प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक बातमीच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आडपडद्याने संपादकांची असते. आज दै. लोकमतमध्ये भुसावळची बातमी प्रसिद्ध झाली आहे. आकार ५ कॉलम. उंची १२ सेंटीमीटर असावी. किमान ४८ पॉइंटचे शिर्षक आहे, 


'भुसावळात डिजेच्या आवाजाने निघाली चक्क रस्त्यावरची खडी'. ही बातमी अंधश्रद्धा पसरवणारी आहे. डीजेचा आवाज १२० डेसिबलवर वाजवून जर रस्त्यावरची खडी उखडली जात असेल तर तोच आवाज २०० डेसिबल केला तर खदानीत आपोआप खडी फोडता येईल. एवढेच नव्हे तर डीजेच्या आवाजाने जमिनीतील गुप्तधन वर काढणे शक्य होईल. जळगाव सारख्या आर्थिक दुर्बल मनपाने गल्लीबोळात डीजे लावले तर खडी उखडून रस्ते खडीकरणाचे काम सोपे होईल.


या बातमीचे संपादनही गमतीशीर आहे. शिर्षकात खडी निघाली असे म्हटले आहे. पण दाबलेली खडी उखडून बाहेर येईल ? की निघेल ? डुलक्या मारणारा उपसंपादकाला डीजेच्या आवाजाविषयी काहीही माहिती नाही. माणसाला ऐकण्याचा साधारण आवाज ३० डेसिबलचा (कुजबूज), दोघांमाध्ये बोलण्याचा आवाज ४० डेसिबलचा, घारात टीव्ही, म्युझिक सिस्टीमचा आवाज ६० डेसिबलचा असतो.  डिजेचा आवाज किमान ८० वा जास्तीचा ८५ डेसिबल असावा. ८९ डेसिबलवर वाढतो तो आवाज कर्कश्श व असह्य असतो.


डीजेच्या आवाजामुळे रस्ते खराब होतात हा शोध संपादक रवी टाले यांच्या संपादनाखाली निघणाऱ्या दै. लोकमतने लावला. या नव्या शोधाला आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार मिळायला हवा. अभियंता संघटनांनी किमान १०० शाली घालून व १०० किलो पेढे वाटून या शोधाचे जगभरात स्वागत करायला हवे.


आज मकरसंक्रांतीला पोटभर हसवणारी बातमी दिल्याबद्दल दै. लोकमत व खासकरून संपादक रवी टाले यांचे अभिनंदन ...


ताक - जळगावमधील रस्ते डीजेमुळे खराब झाले असा जावाई शोध यापुढे छपरी ठेकेदार लावू शकतील... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या