औरंगाबाद: जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघात अध्यक्ष विनोद काकडे आणि सचिव गिरीधर पांडे यांनी आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
दोन्ही संघटनाच्या सदस्य होण्यासाठी शेकडो पत्रकारांकडून प्रत्येकी 500रुपये या प्रमाणे 10 लाख रुपये जमा करण्यात आले याशिवाय पत्रकार भवनच्या दुरुस्तीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 5 लाख रुपये दिले होतें तसेच इतर अनेक देणगीदार कडून निधी जमा करण्यात आला या सर्व रकमेतून थातुरमातुर कामे करून अपहार करण्यात आल्याची तक्रार काही जागरूक पत्रकारांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.
अध्यक्ष विनोद काकडे आणि सचिव गिरीधर पांडे हे पद्मश्री च्या दैनिकात काम करतात , या घोटाळ्याची कुणकुण लागताच पद्मश्रीनि पांडे यांना घरचा रस्ता दाखवला आता काकडे यांच्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. संघटनांच्या बँक खात्यात 100 रुपये देखील शिल्लक नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
0 टिप्पण्या