मुंबईतील पत्रकार आयकर खात्याच्या रडारवरमुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी व कार्यालयावर २५ फेब्रुवारी रोजी आयकर खात्याने धाड टाकली. या धाडीत अनेक गोपनीय कागदपत्रे सापडली. यात काही कंत्राटदार व अधिकाऱ्यांची नावे आर्थिकदृष्ट्या संशयास्पदरित्या सापडली. या सर्वांची सखोल चौकशीही चालू झाली आहे. याहून कळस म्हणजे काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचीही नावे सापडल्याचे आयकर खात्याच्या सूत्रांचे म्हणणे आहे. 


मुंबई महानगरपालिकेचे वार्षिक बजेट हे ४५ हजार कोटींच्या पुढे आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातो. या भ्रष्टाचाराला प्रसारमाध्यमांतून वाचा फुटू नये यासाठी त्यांना महिन्याकाठी आर्थिक मोबदला देवून 'मॅनेज' केले जाते. हे सर्व वर्षानुवर्षे चालत आहे. मात्र जाधव यांच्यामुळे पाकिटातील रक्कम वाढली गेल्याचा आरोप आहे. 


 जाधव यांच्याकडे फक्त मुंबईत ३२ फ्लॅट व किमान २५ हजार कोटी रुपयांहून अधिक बेनामी संपत्ती आहे, असा भाजपचा आरोप आहे. तरीही जाधव यांच्या कथित कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या चॅनेल व प्रिंट माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात दाखवल्या किंवा प्रसिद्ध केल्या गेल्या नाहीत. 


मुंबईतील मीडियामध्ये मुंबई महानगरपालिका हे बिट मलईदार समजले जातात. यामुळे पालिकेतील असंख्य पत्रकार अगदी २० ते २५ वर्षे हेच बिट घेवून ठिय्या मांडून बसले आहे. अनके पत्रकार प्रसारमाध्यमे बदलतात पण हे बिट सोडत नाहीत. पालिकेच्या जनसंपर्क विभागातून मिळणाऱ्या पत्रकातून ते बातम्यांचा रतीब घालतात, त्यामुळे जनतेच्या खऱ्या नागरी समस्या, भष्टाचार कधीही बाहेर येत नाहीत. 


या सर्व प्रकरणाची आयकर विभागाकडून चौकशी झाल्यास बरेच घोटाळे उघडकीस येवू शकतात. पालिकेतील वार्तांकन करणारे रिपोर्टर, त्यांचे संपादक तर रिपोर्टींगच्या नावे लायझनिंग करणारे पत्रकाररूपी दलाल या सर्वांचीच चौकशी होवू शकते. मात्र हे प्रकरण दाबण्याची शक्यताही मोठी आहे.  


ज्यांची नावे या प्रकरणात चर्चिले जात आहेत, त्यात एका मराठी चॅनलच्या महापालिका बीट बघणारा रिपोर्टर , एका स्थानिक दैनिकचा संपादकाचा समावेश  आहे.  


Post a Comment

0 Comments