हातात पेन घेऊन कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस संपले - सुनील ढेपे



शिर्डी - हातात पेन घेऊन कागदावर बातमी लिहिण्याचे दिवस आता संपले असून, पत्रकारांनी काळाबरोबर स्वतःला अपग्रेड केले पाहिजे, सध्याचे युग डिजिटल मीडियाचे असून, फाईव्ह जी सुरु झाल्यानंतर मीडियात आणखी क्रांतिकारक बदल होतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांनी येथे केले. 


महाराष्ट्र पत्रकार संघाचे १८ वे अधिवेशन शिर्डी येथे पार पडले. यावेळी 'डिजिटल मीडिया - पत्रकारासाठी एक संधी' या विषयावर  ढेपे बोलत होते. व्यासपीठावर पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे - पाटील , माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे , साधना न्यूज चॅनलचे कार्यकारी संपादक पुरुषोत्तम सांगळे , भाजपचे प्रवक्ते आणि माजी न्यूज अँकरअजित चव्हाण आदी उपस्थित होते.


कागदाचे वाढलेले भाव आणि एकदंरीत खर्च यामुळे येत्या तीन वर्षात अनेक वृत्तपत्रे बंद पडून त्याची जागा ईपेपर घेतील, पण यापुढे ईपेपर वाचण्यासाठी पैसे मोजावे लागतील.  सध्या चालू असलेल्या न्यूज चॅनलला देखील घरघर लागेल आणि स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून अनेक डिजिटल चॅनल उदयास येतील.  डिजिटल मीडिया हेच भविष्य असल्याने पत्रकारितेत कार्यरत असलेल्या प्रत्येकाला डिजिटल मीडियाचे सर्व ज्ञान असायला हवे, असेही ढेपे यांनी सांगितले. 

 

यावेळी बोलताना पत्रकार पुरुषोत्तम सांगळे म्हणाले की, सोशल मीडियामुळे पत्रकारांची मक्तेदारी संपली असून, आज प्रत्येकजण पत्रकार झाला आहे.मालक लोकं जोपर्यंत पत्रकारांच्या हिताचा विचार करत नाही, तोपर्यंत पत्रकारांच्या पोटापाण्याचा मूळ प्रश्न सुटणे अवघड आहे.त्रकारांचा प्रतिनिधी विधिमंडळात गेला पाहिजे, पण त्यासाठी राज्यातील दोन लाख पत्रकार एकत्र यावे लागतील. पत्रकार संघटनांचे सवतेसुभे मोडित काढावे लागतील. 

या अधिवेशनास राज्य संपर्कप्रमुख संजय नवले , नगर जिल्हा पत्रकार संघाचे सचिव हरिभाऊ मंडलिक ,  अकोला तालुका अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे संगमनेर तालुका प्रमुख अनिल शेठ चांडक,बाबासाहेब राशिनकर आदी उपस्थित होते. 



यांना मिळाला पुरस्कार 


 सुनील ढेपे -राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार, सागर कोते-राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार,सौ.इंदुबाई सुनील सांगळे-राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार, गौराम दादा खुळे-राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, मनोहर किसन पोकळे -राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार, वेदांत बिल्डकॉन,सिन्नर -राज्यस्तरीय उद्योगभूषण पुरस्कार, प्रकाश कळसगोंडा- राज्यस्तरीय उपसरपंच भूषण पुरस्कार, विरभद्र पोतदार- राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार,सौ.वर्षा पर्शुराम ढेकणे-राज्यस्तरीय महिलारत्न पुरस्कार, देवेंद्र राजपूत -राज्यस्तरीय नवरत्न कृषी व सामाजिक पुरस्कार,डॉ.चंद्रशेखर गवळी-राज्यस्तरीय वैद्यकीय रत्न पुरस्कार,दिपक तोष्णीवाल- राज्यस्तरीय उद्योग भूषण पुरस्कार,सौ.लता विलासराव जायभाये-राज्यस्तरीय उद्योगश्री पुरस्कार, बापुसाहेब हुंबरे- राज्यस्तरीय संपादकरत्न पुरस्कार,  तुकाराम तळतकर-राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार, सौ.छाया शिवनाथ मस्के-राज्यस्तरीय महिलारत्न पुरस्कार, सौ.हेमलता रमेश कुंभार-राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार,सौ.सुरेखा दिपक पाटील- राज्यस्तरीय उद्योगरत्न पुरस्कार,  दशरथ खैरनार- राज्यस्तरीय आदर्श उद्योगरत्न पुरस्कार, स्नेहल संदिप पवार- राज्यस्तरीय महिला उद्योजिका पुरस्कार,  प्रकाश घोडके व सौ.पुष्पलता घोडके -राज्य.आदर्श माता -पिता पुरस्कार  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या