पिंपरी - चिंचवड : सध्या डिजिटल मीडियाचा बोलबाला आहे. काळाची पाऊले ओळखून पिंपरी - चिंचवड येथून ‘‘महाईन्यूज’’ हे ईपेपर सुरु करण्यात आले असून, या ईपेपरच्या कार्यकारी संपादकपदी सुनील आढाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आढाव गेल्या १२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत.
‘‘महाईन्यूज’’ ऑनलाईन पोर्टल, ई-पेपर, यु -ट्यूब चॅनल तसेच पॉडकॉस्ट या मीडिया हाऊसचे कामकाज पुण्यभूमी पुण्यातून कॉर्पोरेट पद्धतीने २०१७ पासून सुरू आहे. विस्तारीकरणाचा भाग म्हणून आढाव यांची नियुक्ती व रचना सुरू असून महाराष्ट्रभर गावांमध्ये तसेच वाड्या- वस्त्यांपर्यंत ‘‘महाईन्यूज’’ पोहोचवण्याचा संस्थेचा संकल्प आहे. याबाबत आढाव यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सर्व तालुका व गाव पातळीवर पत्रकार नियुक्त करून पत्रकारांचे मजबूत जाळे तयार करणे. शहरातील सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामीण भागात वैशिष्टपूर्ण काम करणाऱ्या पंचायती, व्यक्ती, संस्था, समूह आणि संघटना,महिला व कृषी बचत गट आणि स्टार्टअप उद्योग – व्यवसायांच्या तसेच प्रशासनात मोठ्या पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांच्या यशोगाथांचे संकलनसुद्धा ‘‘महाईन्यूज’’ च्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
दरम्यान, एक्स्प्रेस मीडिया एन्टरप्रायझेस व्यवस्थापनाची बैठक नुकतीच पुणे येथील कार्यालयात झाली. यावेळी ‘‘महाईन्यूज’’चे संस्थापक आणि मुख्य संपादक अधिकराव दिवे-पाटील यांनी सुनील आढाव यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी एक्स्रपेस मीडिया इंटरप्राझेसच्या संचालिका मनिषा थोरात-पिसाळ, समन्वयक निलेश सायंकर आदी उपस्थित होते.
सुनील आढाव यांच्याविषयी :
मुंबई विद्यापीठातून कंप्युटर सायन्समधून बीएससी करूनदेखील आढाव यांना १२ वर्षे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषेतील माध्यमक्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक वार्ताहर, मुंबई मित्र, दैनिक गावकरी, मुंबई लोकमत, मुंबई पुढारी, हमारा महानगर, कृषीवल, दिव्य मराठी आदी दैनिकांत कलासंपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
0 टिप्पण्या