एबीपी माझाची मधली ओळ मध्येच अडकली आणि सरिता कौशिक पुढे सरकल्या.,,,

खांडेकर यांना दिल्लीला का हलवले ? सरिता कौशिक यांची वर्णी का लागली ? मधली ओळ मध्येच का अडकली ? वाचा सविस्तर... 



मुंबई - एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांची एबीपी ग्रुपच्या चॅनल हेडपदी नियुक्ती झाल्याने त्यांची दिल्ली येथे बदली झाली आहे. दरम्यान एबीपी माझाच्या संपादकपदी नागपूरच्या ब्युरो चीफ सरिता कौशिक यांची वर्णी लागली असून, त्यांच्या नियुक्तीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 



राजीव खांडेकर हे सन २००८ पासून एबीपी माझाचे संपादक होते. पूर्वी  नंबर १ वर असलेले चॅनल गेल्या  ३३ आठवड्यापासून  नंबर तीन वर गेले आहे. त्यात मातोश्री बरोबर असलेली जवळीक देखील अंगलट आली आहे. महाविकास सरकार बदलले आणि चॅनलचे नागपूरच्या रेशीम बागबरोबर कनेक्शन पुन्हा  जुळले, त्यामुळे खांडेकर यांना दिल्लीला हलविण्यात आले असून , मुंबईत नागपूरच्या ब्युरो चीफ सरिता कौशिक यांची वर्णी लागली आहे. 


खांडेकर यांच्या जागी वर्णी लागावी यासाठी उस्मानाबादची मधली ओळ खूप प्रयत्नशील होती, पण मधली ओळ  मध्येच अडकली. या मधल्या ओळीच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आणि तू फक्त डिजिटलवर मधली ओळ करत जा म्हणून सल्ला देण्यात आला. मधल्या ओळीने मागे इलेक्शनमध्ये गोविंद बाग ते रेशीम बाग असा शो केला होता. पण गोविंद बाग पेक्षा रेशीम बाग सरस ठरली आहे 


सरिता कौशिक यांना मराठी व्यवस्थित जमत नाही, हिंदी मिश्रित मराठी आहे.त्यामुळे कौशिक यांच्या  नियुक्तीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

दरम्यान , राजीव खांडेकर यांची दिल्लीत बदली झाली असली तरी त्यांनी मुंबई ऑफिसमध्ये  आपल्या पादुका कायम ठेवल्या आहेत .म्हणजे त्यांनी आपली कॅबिन सरिता कौशिक यांना दिलेली नाही,  सध्या कौशिक सेल्स आणि बिझिनेसमधील एका  कॅबिनमध्ये बसून संपादक झाल्याचे समाधान मानत आहेत. 


जाता - जाता : 

1. एबीपी माझासाठी टीव्ही ९ चे संपादक उमेश कुमावत यांचे नाव आघाडीवर होते, पण अंतर्गत राजकारण पाहून कुमावत हे  स्वतःहून स्पर्धेतून बाहेर पडले होते. 


2. मधली ओळ चा एबीपी माझातून पत्ता कट झाल्यानंतर त्याने लवकरच सुरु होणाऱ्या न्यूज नेशन चॅनलसाठी प्रयत्न केले, पण इथंही त्याची डाळ शिजली नाही... मधल्या ओळीवर सगळीकडे आडवी रेष पडत आहे, त्यामुळे उस्मानाबादमध्ये स्वतःचे कंदील सुरु करत आहे ...

मनावर  घट्ट दगड ठेवून वाढदिवस  सेलिब्रेट करताना राजीव खांडेकर ... 

एबीपी माझाच्या नूतन संपादक सरिता कौशिक यांचा काल ( शुक्रवार ) वाढदिवस होता, चॅनलच्या स्टुडिओमध्ये वाढदिवस सेलिब्रेट  करताना ग्रुपचे संपादक राजीव खांडेकर.... 

-----------------

ता. क. - या फोटोबद्दल आपल्याला हटके कॅप्शन सुचली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा... 


Post a Comment

0 Comments