मांडवलीकर व टिकली चोर यांच्या जयसिंगनगरातील पट्ट्याचे अक्षरशः लोटांगण

जयसिंगनगरातील पद्मश्रींच्या विभागीय कार्यालयाचा बाजार उघड





केस करू नका म्हणून कार्यालय प्रमुखाने धरले पाय : लिडरला गालबोट



कोल्हापूर : पद्मश्रीचे मुख्य कार्यालय व विभागीय कार्यालयातील अनेक घटना उघडकीस येत आहेत. त्यात जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना जयसिंगराजाच्या नगरीतील कार्यालयात शुक्रवारी घडली. पोलिसांनी, ज्यानी बातमी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध केस टाका असे सांगितल्यानंतर संतापलेल्या असोसिएशनच्या सदस्यांनी कार्यालयात घसून, टेबलवर बसून कार्यालय प्रमुखाला खोट्या बातमीचा जाब विचारला. बघता बघता बातमी जयसिंगनगरात पसरली. अन् पद्मश्रीच्या कामकाजाची लक्तरे ओढून काढली. या घटनेमुळे जयसिंगनगरातील पद्मश्रींच्या कार्यालयाची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.


                       आपल्या जादुई लेखणीतून जयसिंगनगराला संतोषी बनवलेल्या त्या कार्यालय प्रमुखाने माझ्यावर केस करू नका, मी दोन दिवसात खुलासा देतो, बातमी देणारा माणूस दाखवतो, बातमी देणारे तीन जण आहेत असे सांगत त्यांची नावे 'त्याने ' जाहीर केली. अन् असोसिएशनच्या पायावर लोटांगण घेतले. 200 हून अधिक संख्येने जमलेल्या असोसिएशनच्या लोकांनी पद्मश्री व कार्यालय प्रमुखांचा चांगलाच समाचार घेतला. स्वतः "खंडणीबहाद्दर " असताना दुसऱ्यांच्याकडे बोट का ? नदीपलीकडील 'जीव' संस्थेतून कुणी एक पेटी आणली. औद्योगिक वसाहत मधील ' श्री ' कारखान्यात कुणी पाच पेट्यांचा ढपला पाडला. असा जाब असोसिएशनने विचारल्यानंतर कार्यालय प्रमुखाची बोलती बंद झाली.


                 मांडवलीकर व टिकली चोराचा पट्ट्या म्हणून ओळख असणाऱ्या या कार्यालय प्रमुखाला स्वतःचा बचाव करण्यासाठी 'काळ 'च्या गणपतीला, लोकांचे मत ऐकून येणाऱ्या 'दीप 'ला, 'स्वाभि' च्या 'नळी 'ला बोलवावे लागले. परंतु मदतीला आलेल्या 'त्या ' दोघांनी सत्य परिस्थिती समजल्यावर काढता पाय घेतला. त्यामुळे एकटे पडलेल्या त्या प्रमुखांने असोसिएशनच्या पायावर डोके ठेवून माफी मागितली. तर असोसिएशनने महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच राजस्थान बिहारमधील सर्व कामगार घेऊन मुख्य कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा दिला. चिडीचूप झालेल्या त्या कार्यालय प्रमुखाने नंदीवरून आलेल्या महादेवाकडून 'रेश ' व 'वेद ' यांना 50 : 50 देऊन सुद्धा काही उपयोग नाही. अशी भाषा पुटपुटत कार्यालयातून पोबारा केला.


 सोलापुरी बातमीदारी

 सोलापुरातील सरकारी नर्सिंग ट्रेनिंग सेंटरच्या एक प्राचार्या ज्याला - त्याला ॲट्रॉसिटीची धमकी देण्यात महिर आहेत म्हणे... त्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. त्या विद्यार्थ्यांना ही जातीवरून, परिस्थितीवरून हिणवतात, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. 


मागील दोन दिवसांपासून  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  चाळीस-पन्नास विद्यार्थी उपोषणाला बसलेत. काल दोन विद्यार्थिनी अस्वस्थ झाल्याने सिव्हिलमध्ये दाखल करावे लागले. याबाबत   ज्या दैनिकात बातम्या आल्या त्या दैनिकांच्या संपादकांना व वार्ताहर प्र. प्राचार्या फोनवर दमबाजी करतात. लातूरच्या एका परिचारिका संघटनेवर त्या अध्यक्षा, अन मुंबईतील वजन वापरून चौकशी समितीला ही त्या दाद देत नाहीत. सोलापुरातील 'मानबिंदू'चे  या मॅडमचे आडनाव बंधू व इतर जातबांधव मात्र मुग गिळून गप्प आहेत. आणि जिथे- तिथे बत्ती लावणारे 'बत्ती' वाले पण बातमी का येत नाही म्हणून विचारत नाहीत, हे विशेष... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या