मुस्तान मिर्झा यांना राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर

 




मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पत्रकारिता युवा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार  मुंबई तक डिजिटल चॅनेलचे प्रतिनिधी मुस्तान मिर्झा ( धाराशिव ) यांना जाहीर झाला आहे. 


या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनी रविवार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे कार्याध्यक्ष खा.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारांचे स्वरूप रुपये एकवीस हजार आणि सन्मानचिन्ह असे आहे.


 मुस्तान मिर्झा यांनी एबीपी माझा, झी24 तास, ईटीव्ही या वृत्तवाहिनीच्या काम करत असताना विविध विषय हाताळले आहेत. सध्या ते इंडिया टुडे ब्रँडच्या मुंबई तक या डिजिटल चॅनेलमध्ये काम करत आहेत. 


आतापर्यंत त्यांनी ग्रामीण भागातील समस्या, दुष्काळी भाग, गारपिटी, अतिवृष्टी, पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीविषयक सकारत्मक बातम्या हे विषय हाताळले. रात्रीच्या लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास दाखवण्यासाठी रात्रीच्या 12 वाजता थेट बांधावर जाऊन समस्या दाखवल्या. कोरोना काळात ग्राउंड रिपोर्ट, मजुरांचे, रुग्णांचे, सामान्य नागरिकांचे हाल कसे बेहाल आहेत, यावर रिपोर्टींग केलं आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या