'उघडा डोळे, बघा नीट ' चॅनलमध्ये 'साहेब आणि बाईसाहेब' यांच्यात 'कोल्डवॉर' सुरु


मुंबई - 'उघडा डोळे, बघा नीट ' या मराठी न्यूज चॅनलमध्ये सध्या  'साहेब आणि बाईसाहेब' यांच्यात 'कोल्डवॉर' सुरु आहे. "रेशीमबाग " च्या कृपाशिर्वादामुळे दाखल झालेल्या 'बाईसाहेब' किती अपयशी आहेत हे सिद्ध करण्यासाठी दिल्लीत नाईलाजाने गेलेले साहेब बाईसाहेबाना अडचणीत आणण्यासाठी नाना लुप्ता करीत आहेत. त्याच व्यहरचनेचा भाग म्हणून साहेबाचे पंटर चॅनल सोडून जात आहेत. 


'जब - तक साहेब,  तब - तक हम ' म्हणणारे दोघेजण आता मुंबई तक जॉईन करीत आहेत. त्यात मुंबईतील  एक आणि दिल्लीतील एकाचा समावेश आहे. बाईसाहेब आल्यापासून चॅनलला जणू गळतीच  लागली आहे. व्हाईस ओव्हरचा बादशहा समजणारा जाणारा 'पप्पू' मध्यतंरी तीन महिने रजा टाकून गेला होता, इकडे तिकडे तोंड मारूनही मनासारखे पॅकेज आणि पोस्ट न मिळाल्याने पुन्हा वापस आला पण सेम टू सेम 'पप्पू' सारखा व्हाईस ओव्हर देणारा न्यूज १८ लोकमत जॉईन केला आहे. तसेच अनेकजण पुढारीच्या नव्या चॅनलला जॉईन होत आहेत. 


बाईसाहेबाचा स्वभाव खूपच वाईट आहे, त्यामुळे चॅनलला गळती लागली आहे , अशी हवा पसरवली जात आहे. साहेब असताना चॅनल नंबर १ वर होते पण आता काही खरे नाही असे गॉसिफ केले जात आहे. एकदा बाईसाहेब गेल्या की पुन्हा सगळे एकत्र येऊ असा निर्णय केला गेला आहे. साहेब आणि बाईसाहेब यांच्यातील या  'कोल्डवॉर' मुळे चॅनलचा टीआरपी मात्र दिवसेंदिवस घसरत चालला आहे. झी २४ तासने पुन्हा एकदा Barc बार्कचे सब्स्क्रिप्शन घेतले आहे, त्यामुळे झी २४ तासचा टीआरपी पुन्हा गणला जाणार आहे तसेच न्यूज नेशनच्या न्यूज स्टेट महाराष्ट्र चॅनलनेही बार्कचे सब्स्क्रिप्शन घेतले आहे. या दोन्ही चॅनलचा शेयर्स विभागला गेला तर 'उघडा डोळे, बघा नीट चॅनलचे डोळे चांगलेच पांढरे होणार आहेत. 


Post a Comment

0 Comments