सांगलीत बातम्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मांडला बाजार




कोणत्याही बातम्यांसाठी मोजावे लागतात संयोजकांना पैसे


सांगली जिल्ह्यात सात जणांच्या वृत्त वहिनीच्या टोळक्यांनी मोठा हैदोस घातलाय. कुस्ती स्पर्धा, बैलगाडा स्पर्धा असो किंवा कोणताही राजकीय कार्यक्रम हे दाखवण्यासाठी हातात मलिदा ठेवल्याशिवाय बातम्या लावल्या जाणार नाहीत अशीच पद्धत इथे पाडण्यात आलीय. संयोजक सात जणांच्या टोळक्याला सांगलीतील लोक अक्षरशः वैतागले आहेत. 


या सात जणांमध्ये राज्यातल्या अग्रगण्य आशा सात वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आहेत. हे एखाद्या बातमीला गेले की कार्यक्रम संपल्या संपल्या संयोजकांच्या मागे पैशांसाठी हातधुवुन मागे लागतात. पहिला आकडा ३५ हजार नंतर तडजोड अंती १४ हजार घेऊन हे मागे फिरतात. तुम्हाला राज्यभर प्रसिद्ध व्हायचे असेल तर आम्हाला खुश केले पाहिजे अशी भूमिका यांची असते. काही दिवसापूर्वी पार पडलेल्या रुस्त मे हिंद बैलगाडी शर्यतीसाठी उघडा डोळे बघा निटच्या रिपोर्टरने महिन्यापासून फिल्डिंग लावली होती. लाईव्ह प्रक्षेपण करून दिवसभर राज्यात तुम्हालाच प्रसिद्ध करतो असे आमिष दाखवलं. आम्ही सात जण म्हणत स्पर्धा संपल्या संपल्या संयोजक पैलवानला बाजूला नेऊन पैसे घेतले नंतर मैदानापासून काही अंतरावर अंधारात जाऊन पैशांची वाटणी करण्यात आली. पैसे मिळाल्यानंतर ब्रेकिंग वर ब्रेकिंग शर्यतीच्या बातम्या लागल्या. 


अशाच पद्धतीने काही  दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील एका गावच्या यात्रेत इराण चा मल्ल विरुद्ध सिकंदर शेख याची कुस्ती झाली. या कुस्ती स्पर्धेसाठी सामर्थ्य महाराष्ट्राचे या वृत्तवाहिन्या प्रतिनिधीने फिल्डिंग लावली होती. कुस्ती स्पर्धा संपल्या संपल्या संयोजकांना बाजूला नेऊन त्याच्याकडून मोठ्या रकमेची मागणी केली. नंतर चर्चे अंती १५ हजार रुपये घेऊन हे टोळके मागे फिरले. अशाच पद्धतीने या टोळक्याने जिल्ह्यात लूटमार सुरू केल्याने अनेकजण त्रस्त झाले आहेत. वरिष्ठांकडे याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सर्वजण हतबल झाले आहेत. 


जाता - जाता

राहा एक पाऊल पुढेच्या रिपोर्टरला शेअर मार्केट घोटाळ्यात मोक्का अंतर्गत अटक झाल्यानंतर चॅनलने त्याला तडकाफडकी काढून टाकल्याच्या मेल चे स्क्रीन शॉट जिल्ह्यातील प्रत्येक व्हाट्स अप ग्रुपवर तुफान व्हायरल झाले. यानंतर पाण्यात देव ठेऊन बसलेल्या या टोळक्याने आपल्या ग्रुप मध्येच चे चॅनल यायला पाहिजे यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. यासाठी एक प्यादा यांनी पुढे केला आहे. त्याच्यासाठी जोरदार वशिलेबाजी सुरू झालीय. कोल्हापूरच्या ब्युरोला हाताशी धरून हा डाव आखला जात आहे. 


सांगलीप्रमाणेच सोलापूर, बीड, धाराशिव, गडचिरोली, नाशिक आदी जिल्ह्यात देखील वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी असाच बाजार मांडला आहे. कोणत्याही बातम्यांसाठी संयोजकांना पैसे मोजावे लागतात.  कव्हरेजला जाण्यासाठी एसी गाडी ,. दिवसभराचे मेहनतनामा म्हणून बंद पॉकेट , श्रमपरिहार म्हणून पार्टी हे नित्याचे झाले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या