बेरक्याचे आभार

 


डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म क्षेत्रात निर्भिडपणे आपले मत व्यक्त करणारा सत्याला साथ, अन्यायाला लाथ आणि अन्याया विरूद्धा ठामपणे उभा राहणारा सच्चा पत्रकार ‘बेरक्या उर्फ नारद’ या ब्लॉगचे मी मनापासून आभार मानून बेरक्या बद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करीत आहे. 

२०१६ मराठी मीडिया क्षेत्रात एका दैनिकात ऑपरेटर म्हणुन मी माझ्या कामची सुरूवात केली. त्या दैनिकात दर आठवड्याला सर्व कामरचार्यांची सामुहिक मीटिंग होत असे. मी कामाला सुरुवात करताच  साधारण तिसर्‍या दिवशी मिटिंगचा दिवस आला आणि त्या दैनिकाच्या संपादक साहेबांनी माझ्यासह सर्व कर्मचार्‍यांना त्यांच्या कॅबीनमध्ये बोलावून सूचना दिल्या की, ऑफिसमध्ये कोणीही बेरक्या उर्फ नारद हा ब्लॉग उघडणार नाही. मिटींग संपताच त्या दैनिकातील कर्मचारी संपादकाची नजर चुकवुन बेरक्या नारद हा ब्लॉग उघडून त्यावरील बातम्या वाचित होते. त्यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आले की, बेरक्या उर्फ नारद या ब्लॉगचा हेतु फक्त सत्य जगासमोर मांडणे आणि खरी पत्रकारीता काय असते. हे जगासमोर उघड करण्याचा हेतु असलेला ब्लॉग आहे. बेरक्या उर्फ नारद या ब्लॉग विषयी बर्‍याच लोकांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. बेरक्या हा ब्लॉग मराठी मीडियात क्षेत्रात काही लोकांच्या नजरेज खुपतोय, असे मी माझ्या ७ वर्षाच्या अनुभवातुन सांगु शकेन. मात्र त्याच बरोबर बेरक्या हा ब्लॉग वाचु नये म्हणुन बर्‍याच दैनिकात कर्मचार्‍यांवर र्निबंध घारल्यानंतरही त्या दैनिकांतील कर्मचारी मालक, संपादक, व्यवस्थानाची नजर चुकवुन बेरक्या हा ब्लॉक वाचतात. हा बेरक्याचा मराठी मिडीया क्षेत्रात मोठा विजय आहे असे मी समजतो. बेरक्या हा ब्लॉग लोकांपर्यंत पोहचु नये म्हणुन काही लोंकानी तर त्यांच्या कार्यालयात बेरक्या हा ब्लॉग वाचु नये असे सुचना फलकच लावले आहेत. मात्र तरी देखील बेरक्याचे वाचक कमी होत नसावेत असा माझा विश्वास आहे. 

मी बेरक्याबद्दल लिहावे तेवढे कमी आहे, पण मोजक्या शब्दात मी माझ्या भावना व्यक्त करतांना पुन्हा एकदा बेरक्या हा ब्लॉग सुरू केल्याबद्दल आणि अन्यायाविरूद्ध माझी बाजु जगासमोर उघड केल्या बद्दल बेरक्याचा आभार मानतो. आणि येणार्‍या डिझिटल मीडिया क्षेत्रात ‘बेरक्या उर्फ नारद’चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल असा माझा ठामपणे विश्वास आहे.
धन्यवाद,

आपला, 
 अमोल इंगळे, अकोला 

Post a Comment

0 Comments