उघडा डोळे बघा नीट चॅनलच्या कुकर्मीने बातमी येऊ नये म्हणून पत्रकारांना पैसे वाटले ( Video )

धाराशिव - स्वतःला स्टार पत्रकार समजला जाणारा उघडा डोळे बघा नीट चॅनलचा कुकर्मी धाराशिव जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मूग गिळून गप्प आहे. त्याच्या चॅनलला या प्रकरणाची साधी  'मधली ओळ' देखील आली नाही. 


या प्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये पाच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून, यातील मुख्य आरोपी  काका उंबरे  हा कुकर्मीचा मावसभाऊ आहे. हा काका उंबरे   स्वतःला वारकरी समजतो, वाणेवाडी येथे आध्यात्मिक आश्रमशाळा चालवतो. त्यात कुकर्मीने पैसा गुंतवल्याची चर्चा आहे. 


संस्थाचालक आणि अध्यात्माचे धडे देणाऱ्या महाराजांनी दहावीत शिकणाऱ्या प्रेम लहू शिंदे या १४ वर्षीय विद्यार्थ्यांला बेदम मारहाण करून, त्याला गळफास दिल्याचा आरोप आहे. 


या  प्रकरणाची बातमी येऊ नये म्हणून कुकर्मीने पत्रकारांना पैसे वाटप केल्याचा आरोप मुलाच्या आई वडिलांनी केला असून,  पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्याकडे धाराशिवमध्ये आपली कैफियत मांडली. यावेळी करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये कुकर्मीचे कुकर्म ऐकायला मिळत आहेत. 


२० वर्षांपूर्वी धाराशिव बसस्थानकावर एसटीडी सेंटरवर सलग तीन वर्षे दरमहा ३०० रुपयावर काम करणारा कुकर्मी नंतर पत्रकारितेत कसा आला आणि दांडके हातात घेऊन लाखो रुपयाची संपत्ती गोळा केली,याचे रसभरीत किस्से धाराशिवमध्ये ऐकावयास मिळत आहेत. 


चॅनल प्रशासनाने आता तरी नीट  डोळे उघडून कुकर्मीकडे थेट बघण्याची गरज आहे,. 

व्हिडीओ पाहा 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या