एबीपी माझाला घरघर , हे आहे मुख्य कारण ...
मुंबई - कधी काळी टीआरपीमध्ये नंबर १ असलेल्या एबीपी माझाला मागील एक वर्षापासून घरघर लागली असून, 'साहेब विरुद्ध बाईसाहेब' या गटबाजीमुळे चॅनलचे पाय आणखी खोलात रुतत चालले आहेत. 


' उघडा डोळे बघा नीट' म्हणत एबीपी माझा अनेक वर्षे नंबर १ होते. सुरुवातीला साम मराठी चॅनलने त्याला मागे टाकले, नंतर झी २४ तास आणि नंतर टीव्ही ९ मराठीने मागे टाकले. झी २४ तास टीआरपीमधून बाहेर पडल्यानंतर हे चॅनल तीन वरून दोनवर नशिबाने आले पण आता न्यूज १८ लोकमतने भरारी घेतल्यामुळे हे चॅनल पुन्हा तीनवर गेले आहे. 


झी २४ तासने बार्कचे पुन्हा सब्सक्रिप्शन घेतल्याचे वृत्त आहे. झी २४ तासचे टीआरपीमध्ये पाऊल पडल्यास  एबीपी माझा तीन वरून चक्क चारवर जाण्याची शक्यता आहे. तसेच पुढारी चॅनलने बार्कचे सब्सक्रिप्शन घेतल्यास एबीपी माझाचा शेयर १० ते १२ टक्के येण्याची शक्यता आहे. 


एबीपी माझामध्ये  'साहेब विरुद्ध बाईसाहेब '  अशी गटबाजी  सुरु आहे. त्यामुळे अनेक चांगले कर्मचारी दुसऱ्या चॅनलमध्ये निघून गेले. कर्मचाऱ्यांना मागील  दोन वर्षापासून वेतनवाढ झालेली नाही, त्यामुळे अनेकजण निघून जात आहेत. साहेबाची दिल्लीत बदली झाली तरी मुंबईतच तळ ठोकून बसल्याने आणि चॅनल प्रोग्राम तसेच बातम्यांमध्ये ढवळाढवळ केल्याने चॅनलला अधिक  घरघर लागली आहे. तसेच कुकर्मीसारखे पत्रकार गलेलठ्ठ वेतन घेऊन धाराशिवसारख्या छोट्या शहरात बसून जगाच्या गप्पा मारत बसल्याने आणि फॉल्स बातम्या दिल्याने चॅनलची विश्वासहर्ता कमी झाल्याने त्याचा परिणामही टीआरपीवर झाला आहे. 


असा आहे टीआरपी. -- 
Post a Comment

0 Comments