माजलगावच्या पत्रकारांची अशीही पाकीट पत्रकारिता

पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्याचे कारण आले समोर 


बीड - लोकसभा निवडणुकीचे आज बिगुल वाजले. त्यामुळे पाकीट पत्रकारिता करणाऱ्या पत्रककारांना सुगीचे दिवस आले आहेत. जे राजकीय नेते पाकीट देतील त्याची बातमी द्यायची अन्यथा बातमीच काय, त्या राजकीय नेत्याच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय अनेक ठिकाणी सुरु आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये आज एका राजकीय नेत्याच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्यात आला. कारण ऐकून राज्यतील पत्रकारांची मान शरमेने खाली नक्कीच जाईल. 


 माजलगावमध्ये एका आमदाराने आज ( शनिवार ) पत्रकार परिषद ठेवली होती. बातमीसाठी हे आमदार महोदय, पत्रकारांना लायकीप्रमाणे पाकिटे देत असतात. ( अ - वर्ग ) वृत्तपत्र पत्रकारांना  ५ हजार, ब - वर्ग पत्रकारांना ३ हजार , क - वर्ग पत्रकारांना २ हजार   आणि युट्युब आणि साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकारांना ५०० रुपयाचे पाकीट  देण्यात आले. पण ५०० रुपये पाकीटवाल्या पत्रकारांनी किमान दोन हजार तरी द्यावे म्हणून पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकून रागारागाने शिव्या -शाप देत निघून गेले. त्याची बीड जिल्ह्यात चवीने चर्चा सुरू आहे. 


Post a Comment

0 Comments