पत्रकार रविंद्र कोकाटेविरुद्ध द्वेषाने खोटी तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न

 



खेड - दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी कोकणातील खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा क्र. ६५/२०२४ च्या तपासादरम्यान,एका महिला पत्रकाराने एबीपी माझाचा तत्कालीन रिपोर्टर  रविंद्र उर्फ बाळू मनोहर कोकाटे यांच्याविरुद्ध द्वेषाने खोटी तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी 'ब' समरी विथ प्रॉसिक्यूशन दाखल करण्यात आली आहे.

घटनेची पार्श्वभूमी

दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी लोटे एम.आय.डी.सी. येथील संत ज्ञानेश्वर माऊली गो शाळेच्या परिसरात फिर्यादी महिला पत्रकार  या भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाचे व्हिडिओ शुटिंग करत असताना,  रविंद्र उर्फ बाळू कोकाटे यांनी त्यांच्या छातीला दोन वेळा कोपर लावून अश्लील विनोद केल्याचा आरोप होता.

तपासानंतरचा निष्कर्ष

उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी केलेल्या तपासात फिर्यादी यांनी कोणतीही घटना न घडता केवळ वैयक्तिक दुश्मनीतून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी 'ब' समरी विथ प्रॉसिक्यूशन दाखल करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या