वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी दैनिक पुढारी या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 24 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या या बातमीत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते.
डॉ. अरुण जऱ्हाड यांनी या बातमीला निराधार आणि बदनामीकारक म्हटले आहे. दैनिक पुढारीचे वार्ताहर नितीन थोरात यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 356 (1), 356 (3) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
या वृत्तपत्राने आपली बाजू मांडण्याची संधी न देता हेतुपुरस्सर बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याचा आरोप डॉ. अरुण जऱ्हाड यांनी केला आहे. यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची समाजात बदनामी झाल्याचे आणि त्यांना मानसिक त्रास झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
0 टिप्पण्या