मुंबई: बड्या माध्यम समूहाची विश्वासघाताने फसवणूक करणाऱ्या 'भ्रमंती' पत्रकाराची हकालपट्टी करण्यात आली आहे. हॉटेल्स आणि जेवणाची बोगस बिले जोडून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या या पत्रकाराची फसवणूक उघडकीस आली आहे.
मागील वर्षी एका प्रसिद्ध गायिकेची फसवणूक केल्याप्रकरणी या पत्रकाराचे नाव चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा त्याने बोगस बिलांच्या माध्यमातून फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याशिवाय, या पत्रकाराने पत्रकार संघटना स्थापन करून राजकीय नेत्यांकडून लाखो रुपयांच्या देणग्या घेतल्याचाही आरोप आहे.
बोगस बिलांच्या आधारे फसवणूक करणाऱ्या या पत्रकाराविरोधात संबंधीत माध्यम समूह मागील वसुली काढण्यासाठी आजपर्यंतची बिले तपासत आहेत. यातून आणखी मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे,
याला चार ओळी देखील नीट लिहिता येत नाहीत, पण तो मोठा लेखक म्हणून मिरवत होता. नाशिकच्या एका फिचर सर्व्हिसकडून लेख घेऊन स्वतःच्या नावावर खपवत होता. हा भ्रमंती नव्हे मुलीच्या नादी लागून भ्रमिष्ट झालेला पत्रकार आहे.
0 टिप्पण्या