छत्रपती संभाजीनगर - विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्यात आपला दौरा पूर्ण केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांवर गंभीर आरोप केले.
सोलापुरात आपण "आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण देण्याची गरज आहे" असे म्हटले होते. या वक्तव्याशी जरांगेपाटील यांच्याशी काडीचाही संबंध नव्हता. मात्र, धाराशिवमध्ये या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला.
धाराशिवमध्ये पुष्पक पार्क हॉटेलमध्ये थांबलो असता, काही मराठा आंदोलकांनी आपल्यासमोर आंदोलन केले. आंदोलकांचा मुद्दा ऐकण्यासाठी मी तयार होतो. परंतु काही पत्रकारांनी त्यांना भडकावले. "मी आंदोलकांशी संवाद साधायला तयार होतो, पण काही पत्रकारांनी परिस्थिती अधिक गंभीर बनवली." त्याचे नाव आपणास माहित आहे. तो कुणाचे काम करतो, हेही माहित आहे.
जरांगे पाटील यांचे आंदोलन मराठवाड्यातील काही पत्रकारांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सुपारी घेऊन भडकावले आहे. "काही पत्रकारांनी एमआयडीसीमध्ये प्लॉट, महागड्या गाड्या, जमिनी घेतल्या आहेत. तर काहींना रोडच्या पेव्हर ब्लॉक कामाचे कंत्राट मिळाले आहे," असेही राज ठाकरे म्हणाले.आपण याची तक्रार करणार असून, त्याची चौकशी होईल, असेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी आपल्या आरोपांना दुजोरा देत सांगितले की, त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे आणि त्यांची नावे देखील त्यांना माहित आहेत. हे वक्तव्य करताना त्यांनी आपली गंभीरता स्पष्ट केली आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
0 टिप्पण्या