मुंबई - महाराष्ट्रातील न्यूज चॅनल्सच्या चुरशीच्या स्पर्धेत टिकून राहण्याचा कसरतखेळ सुरू आहे आणि त्यात आपले "लोकशाही मराठी" चॅनल देखील त्याच गणिताच्या तालावर नाचत आहे. सध्या मराठी चॅनल्सची संख्या नऊपर्यंत गेली असली, तरी लोकशाहीचा क्रमांक सहावा आहे. पण थांबा, ही सहाव्या क्रमांकाची पोजिशन हा विजयोत्सव नाही, तर टीआरपीच्या आकड्यांत घसरून पडलेली अस्थायी खुर्ची आहे.
साल २०२० मध्ये चॅनलची भव्य एंट्री झाली, वितरण सिस्टीम तर छानच बांधली, पण टीआरपीच्या बाबतीत मात्र चॅनलची गाडी पाच ते सहाच्या मध्ये अडकून पडली आहे. जनता 'लोकशाही'त अपेक्षित कामगिरीची वाट पाहत बसलीय. आणि संपादक? ते तर 'ये तो चले वो आ गये' ची स्टाईल फॉलो करतायत. नितीन भालेराव, दीपक भातुसे, कमलेश सुतार... अशी संपादकांची यादी रोज बदलत असते, कारण 'संपादक' या पदावर एक वर्षाच्या जास्तकाळ टिकणे म्हणजे सर्कशीत सिंहाला दोन वेळा अगदी जवळून छडी फिरवणं आहे!
आता मात्र सूत्रे विशाल पाटील यांच्या हाती येणार आहेत. अहो, हेच विशाल पाटील, जे आधी 'लोकशाही'चे अँकर होते आणि टीव्ही मीडियातील आपले दुसरे " विग कमांडर " ! मग चॅनल बदलून न्यूज १८ लोकमत, एबीपी माझावर धावून आले, आणि आता शेवटी फिरून परत आपल्या 'लोकशाही'त परतलेत. जणू काही मराठी न्यूज इंडस्ट्रीत 'चॅनल टप्पे' खेळतात की काय!
चॅनलचे नाव "लोकशाही," पण इथे खरी राजवट चालवतोय चॅनल मालक, आणि त्यांची तुंबड्या मॅडम म्हणजेच एचआरची सुप्रिमो. त्यांनी संपादकांच्या कामात ढवळाढवळ केली, आणि संपादकांचा टिकाव लागणं म्हणजे चंद्रावर हॉटेल सुरू करण्याएवढं कठीण! आता विशाल पाटील यांच्या या नवीन पाटीलकीला किती दिवसांची मुदत मिळते, ते पाहणे म्हणजे टीआरपीचीच नवीन सिरियल सुरू होईल!
- बेरक्या उर्फ नारद
0 टिप्पण्या