महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या परभणी जिल्हा प्रतिनिधीस तडकाफडकी कामावरून काढण्यात आले आहे. त्यांच्या जागी हिंगोलीच्या पाटलाची नियुक्ती करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एका राजकीय नेत्याकडून ६-७ लाख रुपयांचे पैकेज घेण्यात आले होते, असे कळते. हे पैसे जिल्हा प्रतिनिधीने कार्यालयात जमा न करता स्वतःकडेच ठेवले आणि या व्यवहाराची कोणतीही माहिती इतरांना दिली नाही.
या पैकेजविषयी वृत्तपत्र मालक दर्डा यांना कोणतीही खबर नव्हती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय नेत्याकडून पैकेज स्वीकारू नये, अशी कडक सूचना मालकांनी दिली होती. मात्र, संबंधित जिल्हा प्रतिनिधीने वरिष्ठांच्या सांगण्यानुसार हे पैकेज स्वीकारले होते, असे त्याचे म्हणणे आहे. मग इलेक्शन पॅकेज नेमकं कुणी घेतलं ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दर्डा यांनी तातडीने चौकशी सुरू केली. त्यानंतर जिल्हा प्रतिनिधी आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास संभाजीनगर कार्यालयात बोलावण्यात आले. त्यानंतर जिल्हा प्रतिनिधीस तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे.
0 टिप्पण्या