आरोग्यमंत्री सावंतांचा वाचाळपणा आणि बटीक पत्रकारांची गोची !

 


धाराशिव जिल्ह्यातील ढोकीत नुकताच आरोग्यमंत्र्यांचा एक कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात बोलताना, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकारांना "बटीक" संबोधलं आणि पुन्हा एकदा त्यांच्या वाचाळपणाने वाद ओढवून घेतला. सावंत साहेबांचं असं आहे,  जे काही मनात येईल ते तोंडातून बाहेर पडतं, मग ते धरण फुटल्याचं कोकणातील खेकड्यांवर आरोप करणं असो किंवा "माझ्याकडे इतका पैसा आहे, महाराष्ट्राला भिकारी बनवेन" असं गर्विष्ठ विधान करणं असो. त्यांचे अशा प्रकारचे तोंडी फटके गेल्या काही वर्षांत व्हायरल होत आहेत.


सावंतांचा पारा चढायचा मुख्य कारण म्हणजे त्यांची वादग्रस्त विधाने पत्रकारांनी चपखलपणे छापणे. त्यामुळे ढोकीतील कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांवर चांगलंच तोंडसुख घेतलं आणि "बटीक" हा शब्द त्यांच्यासाठी वापरला. म्हणजेच, सावंतांच्या मते जे स्वत:ला विकतात आणि त्यांचं तुणतुणं वाजवतात, तेच खरे शूरवीर पत्रकार!


आता या कार्यक्रमासाठी सावंत साहेबांनी बटीक पत्रकारांना चांगली "दक्षिणा" दिली. युट्युबवाल्यांना प्रत्येकी एक हजार रुपये, टीव्हीवाल्यांना पाच हजार, मध्यम पेपरवाल्यांना दहा हजार आणि मोठ्या पेपरवाल्यांना पंधरा हजार रुपयांची जाहिरात देऊन सगळ्यांना कृतार्थ केलं. काही पत्रकारांनी तर कारखान्याच्या दहा वेळा चकरा मारल्या, जाहिरात मिळवण्यासाठी!


पण सगळेच सावंतांच्या "शूरवीर" लिस्टमध्ये नाहीत. जे खरं लिहितात, त्यांचा स्वाभिमान जपतात, त्यांना सावंत साहेबांनी सरळसरळ "बटीक" म्हणून टाकलं. दुसरीकडे, पाय चाटणारे, तुणतुणं वाजवणारे आणि लाचार पत्रकार  मात्र त्यांच्यासाठी खास शूरवीर ठरले.


आता बोला, सावंतांच्या तोंडाचा आणि बटीक पत्रकारांच्या गोचीचा शेवट कधी होणार?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या