सांगलीतील "हनुमान 'साठी नोकरीची साद – संपादकांचे विनंतीनाट्य!

 




सांगली जिल्ह्यातील एक ‘पाकीटवीर’ पत्रकार गेल्या काही वर्षांपासून नोकरीच्या शोधात भटकतोय. "माझं पाकीट तुमच्यावर टाकतो, पगारही स्वतःच भरतो, पण मला संपादक करा!" असं सारखं ओरडणारा हा नवयुगाचा 'स्वयंघोषित' हनुमान सध्या पत्रकारितेचा बेताज बादशहा झालाय. 'कॅश इज किंग' म्हणणारा हा संपादक आपल्या मालकाला स्वतःचा पगार देऊन त्याला पुन्हा आपल्या बँक अकाउंटवर ट्रान्सफर करून घेण्याच्या शक्कलात आहे!


नवयुगाच्या मालकाने तर हा 'पत्रकारी हिरो' आपल्या खिशात टाकलाय. "अरे, हा माणूस आपल्यावर भुंकणार नाही, जर त्याचाच पगार त्याच्याच पैशातून त्याला दिला तर!" असा प्लॅन करत, या 'पत्रकारी चमत्कारा'ला नवयुगाच्या नावावर ठेवून दिलंय. मात्र, या हनुमानाच्या शेपटीला लागलेली आग काही केल्या विझत नाहीये!


राजकीय सल्लागार म्हणून मोठ्या पेपरमध्ये घुसायचं, नेत्यांच्या कानात आपला आवाज घुसवायचा, असं ध्येय समोर ठेवून हा हनुमान दुसर्‍या घरात आग लावायच्या विचारात आहे. दुसऱ्या पेपरच्या माणसावर अफवा उठवणं हा त्याचा छंद झालाय, आणि इतर संपादक तर त्याच्या कॉलचं रेकॉर्डिंग करून त्याच्या रोजच्या सिरीयल्सचा आनंद घेतात.


सांगलीतले नेते तर आता याच्या नंबरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्याच्या ‘अ‍ॅड’ मागण्यांचा कंटाळा घेताहेत. त्याला हजार-दोन हजाराच्या पाकिटात गुंडाळून शांत करायचं तंत्र नेत्यांनी आत्मसात केलंय. हा ‘बाबुराव’ आणि त्याचा चमू सांगलीतल्या पत्रकारितेचा दर्जा कसा खालावलाय यावरच मोठी चर्चा रंगवतोय.

पत्रकारितेची तिरडी उचलण्यासाठी तयार असलेल्या संपादकांच्या समूहाने एकमताने निर्णय घेतलाय: "या हनुमानाला नोकरी द्या, म्हणजे उरलेल्या पत्रकारांचे पाकिटं वाचतील!"


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या